पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना पत्रकार संघाद्वारे सॅनिटायझर वाटप



सोमेश्वरनगर दि २ एप्रिल 


       बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाद्वारे वडगाव निंबाळकर पोलीस ,आरोग्य कर्मचारी ,ऊसतोड कामगार ,पेट्रोल पंप कामगार ई.ना  एक एक लिटर शुद्ध सॅनिटराईझ च्या बाटल्यांचे वाटप करुन कोरोना च्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या  त्यांच्या सेवेचे कौतुक करण्यात आले .
       पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप सोमेश्वर कारखाना कार्यकारी संचालक राजेंद्र यादव ,वडगाव निंबाळकर व्हे स पो नि सोमनाथ लांडे ,पोलीस हवालदार महेंद्र फणसे ,ए एस आय जाधव यांचेसह आरोग्य कर्मचारी परवेझ मुलाणी ,पेट्रोल पंप कामगार ,ऊसतोड कामगार यांचेसह अनेकाना यावेळी प्रत्येकी एक लिटर शुद्ध सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले .
                                               
        प्रास्तावीक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश आळंदीकर यानी केले. स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप यानी केले . यावेळी वडगाव निंबाळकर चे स.पो.नि.सोमनाथ लांडे यानी कोरोना च्या पार्श्वभूमी वर अटक सत्र चालु असुन आत्तापर्यंत १० जणाना अटक केली असुन सर्वांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सांगुन जनतेने प्रशासनास सहकार्य करुन संचारबंदीचे नियम पाळावेत विनाकारण बाहेर पडु नये असे आवाहन केले . कार्यकारी संचालक यादव यानी ऊसतोड कामगाराना अनुदान व किराणा उपलब्ध केले असल्याचे सांगीतले. यावेळी पत्रकार  दत्ता माळशिकारे ,चिंतामणी क्षीरसागर, युवराज खोमणे, तुषार धुमाळ, विनोद गोलांडे ई मान्यवर हजर होते. आभार हेमंत गडकरी यानी मानले.



To Top