सवई सर्जाच्या नावाच चांगभलं! म्हणत वीर ग्रामस्थांनी केले या युवकाचे स्वागत.
पुरंदर : प्रतिनिधी
गेली पन्नास दिवसांच्या काळात पुरंदर तालुक्यातील प्रशासनाने कोरोना मुक्त ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर काही प्रमाणात लोक मुंबई पुणे व इतर शहरातुन गावी येऊ लागले. वीर येथील मुंबई पोलीसातील युवक वीर येथे आल्यानंतर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांचे आज कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि तो मुळ गावी वीर येथे आल्यानंतर सवई सर्जाच्या नावाच चांगभलं! श्रीनाथ म्हस्कोबाच्या नावानं चांगभलं म्हणत त्याच सर्वात ग्रामस्थांनी केल.
वीर येथील पोलीस युवकाने खाजगी लॅब मध्ये कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर हाय रिस्क मधील ७ तर लो रिस्क मधिल १७ लोकांना कॉरंटाइन केले होते. हाय रिस्क मंदिर ७ जणांचे कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यांचे रिपोर्ट कालच निगेटिव्ह आले होते. त्यामुळे आज रोजी वीर गाव कोरोना मुक्त झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.
जाहिरात