पुरंदरच्या नाझरे सुपे येथील एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील वीर येथील युवक उपचाराअंती कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने घरी आल या बातमीने आनंदीत झालेल्या पुरंदरकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाझरे सुपे येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
जेजुरी नजीकच्या नाझरे सुपे येथील व्यावसायाने ड्रायव्हर असलेला एक व्यक्ती मागिल आठवड्यात गाडीवरून पडला होता. तो जेजुरीच्या एक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्यानंतर त्याच्या छातीचा एक्सरा काढला असता डॉक्टरांनी पुणे येथे पुढिल उपचारासाठी पाठवले. त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली असता आज त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती पुढे येत आहे. मागील आठवड्यात एक एकने कोरोना रुग्णाची संख्या पाचवर पोहचली होती. आज वीर येथील रुग्ण उपचाराअंती निगेटिव्ह आला आणि रुग्ण संख्या चार झाली आणि काही क्षणातच पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाली आणि आज परत रुग्ण संख्या परत पाच झाली. आता पुरंदरच्या प्रशासनाची चिंतेत वाढ झाली आहे.
जाहिरात