मुरूम येथे सपोनि सोमनाथ लांडे यांची घटनास्थळी भेट- मुरूम आत्महत्या प्रकरण

Pune Reporter
मुरूम येथे सपोनि सोमनाथ लांडे यांची घटनास्थळी भेट- मुरूम आत्महत्या प्रकरण

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

मुरूम ता बारामती येथील संतोष घोरपडे या युवकाने आत्महत्या केली होती, मात्र ती आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या घरच्यांनी व्यक्त केल्यानंतर वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. 
             मुरूम  संतोष बाबुराव घोेरपडे वय ३२ या व्यक्तीने दि २९ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र  ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय त्याच्या दोन्ही भावांनी काल  व्यक्त केला होता. सदर प्रकरणात आत्महत्या की घातपात या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या करता मृत व्यक्तीच्या बंधूंनी  वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना विनंती अर्ज केला या अर्जामध्ये आमच्या भावाने आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असा विनंती अर्ज मयत संतोष चे भाऊ राजेंद्र घोरपडे व संजय घोरपडे यांनी केला होता. त्यानुसार काल रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षण सुभाष मुंढे आणि त्यांच्या टीम ने मुरूम येथील घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेची चौकशी केली.
जाहिरात
जाहिरात
To Top