निरेत पाळीव डुकरांवरून वाद, एक जण गंभीर जखमी

Pune Reporter
निरेत पाळीव डुकरांवरून वाद, एक जण गंभीर जखमी


नीरा : प्रतिनिधी

     नीरा (ता.पुरंदर) येथील एकाच कुटुंबांतील भावांचा वाद विकोपाला गेला. किरकोळ कारणावरून वाद वाढला आणि दोघा सख्या भावांनी व बहिणीसह दाजीने आपल्याच चुलत भावांनवर तसेच चुलते, चुलती, वहिणीवर हल्ला करून बेदम मारहाण करत  दहशत निर्माण केली. दोन जण गंभीर तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. पाळीव डुकरांनमुळे भाव भावात वाद झाल्यानंतर जेजुरी पोलीसांत शनिवारी रात्री उशिरा तक्रार दाखल झाली आहे.
      जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि.३० रोजी सकाळी आठच्या सुमारास अनिल माने हे नीरा वार्ड क्र.६ मधील घरासमोरील मोरीमध्ये अंघोळ करत असताना एक पाळीव डुकरने त्यांच्या अंघोळीच्या पाण्यत तोंड घातले. त्यामुळे अनिल यांनी बडबड करत आवाज वाढवला. 'अरे यांची सोय करा राव काय चाललंय इथं.' असे म्हणताचे डुकराचे मालक असलेल्या अविनाश वामन माने यांनसह गणेश यशवंत माने, अजय वामन माने, संतोष जाधव व अश्विनी संतोष जाधव सर्व रा. नीरा वार्ड क्र ६, ता.पुरंदर यांनी तावातावत याठिकाणी आले आणि बाचाबाची करत शिविगाळ झाली. दरम्यान या पाच जणांनी अनिल रतन माने, दिनेश अनिल माने, शालन रतन माने, मिना शाम माने, शाम रतन माने व बापु ज्ञानोबा माने यांच्यावर दगड गोटे, लाठी काठी व लोखंडी सळई सारख्या हत्राराने हल्ला चढवत बेदम मारहाण केली. अशी तक्रार फिर्यादी अनिल रतन माने यांनी दिली आहे. 
     शाम रतन माने व बापु ज्ञानोबा माने हे गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर किरकोळ जखमी झाले असून काल संध्याकाळ पर्यंत दोघे गंभीर जखमींवर जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री उशिरा शामा रतन माने यांना लोणी काळभोर येथील रुग्णालयात तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  गुन्हा जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली‌ नीरेचे फोजदार करत आहेत.
जाहिरात

जाहिरात


To Top