पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त गोळ्यांचे वाटप
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 295 व्या जयंती निमित्ताने ताई मेडिकल फाउंडेशन व साध्यम सामाजिक संस्था बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने कोऱ्हाळे खुर्द येथे आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच धनंजय खोमणे यांनी प्रास्ताविक करताना या उपक्रमाचे कौतुक केले, तसेच डॉक्टर चेतन जगताप यांनी या औषधाचे सेवन कसे करायचे कोणती पथ्ये पाळायची याविषयी मार्गदर्शन केले.
अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती व्याख्याता तेजस खोमणे याने उपस्थितांना दिली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच गोरख खोमणे यांनी सर्वांना कोरोना या आजारापासून दूर राहण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले, यावेळी सेवानिवृत्त सेना सुभेदार रामचंद्र खुडे यांच्या शुभहस्ते या औषधांचे वितरण करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्स आणि सुरक्षा काळजी घेऊन औषधाचे वितरण 250 कुटुंबांना करण्यात आले.
यावेळी ताई मेडिकल फौंडेशन चे देविदास जगताप, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भारत खोमणे,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब कोळेकर, कपिल शेंडे, अजित खोमणे,अशोक खोमणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नियोजन ग्रामपंचायत सदस्य सुरज खोमणे, दादा पारसे, अभिजीत खुडे, सचिन चव्हाण, स्वप्नील खोमणे यांनी केले, सर्वांचे आभार प्राध्यापक सचिन पवार यांनी मानले.
जाहिरात