माळेगाव बुद्रूकची महसुली गावाची सीमा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

Pune Reporter
माळेगाव बुद्रूकची महसुली गावाची सीमा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित            
नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

                                                    

बारामती दि.१२
आज दिनांक १२मे रोजी कोरोनाबाबत बारामती तालुक्याची अपडेट्स खालील प्रमाणे आहेत. माळेगाव बु मध्ये आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे  आढळून आले आहे. ती व्यक्ती  व्यवसायाने  वायरमन असून  पुणे येथे  नोकरीस आहे  दिनांक  ८ मे रोजी  माळेगाव  बुद्रुक येथे  आपल्या राहत्या घरी  ते  आले होते. त्यांचा  एक सहकारी  कोरोना पॉझिटिव्ह  आढळल्याने  हाय रिस्क  कॉन्टॅक्ट  तपासणीमध्ये  त्यांची चाचणी  पॉझिटिव्ह आली आहे.  त्यामुळे  माळेगाव बुद्रुकची  महसूली गावाची सीमा  ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात येत आहे.तरी सर्व माळेगाव बु ता बारामती येथिल नागरिकांनी  आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व  लॉकडाऊन दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये व प्रशासकीय यंत्रणेस याबाबतीतच्या नियोजनास तसेच कायदा व सुव्यवस्था कामे सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
जाहिरात
To Top