सोमेश्वरनगर परिसरातील सर्व बँकांच्या वेळेमध्ये बदल करावेत.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या विविध योजनांचे पैसे बँकेत जमा झाल्याने सोमेश्वरनगर परिसरातील बँकांच्या वेळा १० ते २ ऐवजी १० ते ५ करावी अशी मागणी होत आहे.
सोमेश्वरनगर हे बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील मुख्य केंद्र आहे येथे मोठी बाजारपेठ आहे राष्ट्रीयकृत बँक व सहकारी व खासगी अशा अनेक बँका आहेत .या बँकांमध्ये शेतकरी ,कामगार ,ज्येष्ठ नागरिक, महिला ,अपंग, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, शिष्यवृत्ती धारक अशा असंख्य नागरिकांची खाती आहेत .
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने सोशल डिस्टन्स सिंगचे नियम घालून दिला व रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून विविध सरकारी कार्यालये व बँका वा अन्य ठिकाणी जिथे नागरिकांची गर्दी होती त्यांना वेळापत्रक जाहीर केले गेले त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आले पण आता सरकारच्या विविध योजनेतील पैसे खातेदारांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत त्यामुळे सोमेश्वरनगर परिसरामध्ये भर उन्हामध्ये बँकांच्यासमोर पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत .बँकांना वेळेची मर्यादा घालत घालण्यात आली आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये संथगतीने काम करण्याची पद्धत दिसत आहे त्यामुळे बँकांसमोर लांबच्या लांब रांगा लागत आहेत . आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार रविवार या बँका शेजारी असणाऱ्या एटीएममध्ये रक्कम नसते कायमच खडखडाट असतो .त्यामुळे सोमवार मंगळवार व इतर दिवशी सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच बँकांसमोर ग्राहक गर्दी करू लागतात त्यामध्ये. ज्येष्ठ ,नागरिक ,महिला ,अपंग असे व्यक्ती असतात .
बँके कडून खातेधारकांना वेळेची मर्यादा घातली आहे त्यामुळे वेळ कमी व ग्राहक जास्त अशी परिस्थिती सोमेश्वर नगर परिसरात पाहावयास मिळत आहे.तरीही खातेधारकांकडून पूर्वी जे वेळापत्रक होते त्याच प्रमाणे आता बँक उघडावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बडोदा बँके कडून खातेदारांची हेळसांडसोमेश्वरनगर या ठिकणी असलेली बडोदा बँकेकडून नेहमीच सर्वसाधारण खातेदारांची हेळसांड होताना दिसत आहे. या भागातील बडोदा बँक ही जुनी राष्ट्रीयकृत बँक असल्याने शासनाच्या विविध योजनांचे पैसे याच बँकेत येत असतात. सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी ही बँक खातेदारांना बँकेच्या बाहेरच उभी करते, सद्या कडक ऊन असल्याने वयोवृध्द महिलांना कडक उन्हात तासन तास थांबावे लागत आहे. बँकेने खातेदारांची अधिकच्या सावलीची सोय करणे गरजेचे आहे त्याचबरोबर कर्मचारी बळ वाढवावे व बँकेतील अंतर्गत कामाला गती मिळावी अशी मागणी होत आहे.