सोशल डिस्टन्स ठेवत श्री क्षेत्र मोरगाव येथील दुकाने उघडणार

Pune Reporter
3 minute read
सोशल डिस्टन्स ठेवत श्री क्षेत्र मोरगाव येथील दुकाने उघडणार
मोरगांव :   प्रतिनिधी
 सोशल डिस्टन पाळत अष्टविनायक क्षेत्र मोरगाव ता. बारामती येथील दुकाने उघडण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेला आहे . मात्र या दुकानांमध्ये सलून  ,कापड व्यवसाय , बियर बार  ,हॉटेल , पान टपरी यांचा अपवाद असून रविवारी पूर्णपणे गाव बंद ठेवले जाणार असल्याची माहिती सरपंच निलेश केदारी  यांनी  दिली .
#जाहिरात
           कोरोना या विषाणूजन्य आजाराचा जंतु संसर्ग टाळण्यासाठी  गेल्या दीड महिन्यापासून मोरगाव येथील अत्यावश्यक मेडीकल , दवाखाने  , किराणा वगळता  दुकाने बंद होती . त्यामुळे अनेकांच्या पोटा -पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अखेर आज ग्रामपंचायत , प्रशासन पोलीस व महसूल यांनी एकत्र निर्णय घेत ही दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे . यामध्ये सोमवार , बुधवार व शुक्रवार या दिवशी किराणा मालाची दुकाने सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत उघडी ठेवली जाणार आहेत . तर मंगळवार , गुरुवार , शनिवार  या दिवशी हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक ,सोन्याची दुकाने , मोबाईल शॉपी सह इतर दुकाने  सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असतील .
         कोरोणाचा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी सलून , कापड व्यवसाय , ब्युटीपार्लर , हॉटेल , बियर बार , पान टपरी ,ढाबा   ही दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे .तर शेतकरी व व्यापाऱ्यांनी तरकारी व शेतमाल  फिरून विकावा असे आव्हान त्यांनी एका परिपत्रकाद्वारे केलेल्या आहे. रविवारी मात्र संपूर्ण गाव पूर्णपणे बंद राहणार आहे .याचप्रमाणे सोशल डिस्टन्स अवलंब न केल्यास ग्राहकांना शंभर  तर  दुकानदार दोन हजार रुपये दंड पोलीस प्रशासनामार्फत आकारला जाणार असल्याचे त्यांनी या परिपत्रकामध्ये म्हटले आहे.
To Top