सोमेश्वर कारखान्यावर ऊसतोडणी कामगार वसाहतीत आग ,एक झोपडी जळून खाक जीवित हानी नाही
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या ऊसतोडणी कामगारांच्या वसाहतीत आग लागून एक झोपडीसह जनावरांचा चारा जळून खाक झाला, मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज सायंकाळी पाच ते सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास सोमेश्वर कारखान्यावरील ऊसतोडणी कामगारांच्या मोकळ्या वसाहती मधील पाचटाला आग लागली. जोराचा वारा असल्याने काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले. कारखान्याच्या अग्निशामक बंबाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वारा असल्याने ही आग आटोक्यात येत नव्हती, वाघळवाडीचे उपसरपंच जितेंद्र सकुंडे, सदस्य हेमंत गायकवाड, चेतन गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली, सोमेश्वर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी जगताप आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयन्त केला, कारखान्याचा अजून एक पंप आणि निरा जूबिलंट चा अग्निशामक बंब आल्यानंतर ही आग आटोक्यात आली.