आता सभासद आणि कामगारांना मिळणार महिन्याला फक्त १ लिटर सॅनिटायझर, 'सोमेश्वर' चा निर्णय

Pune Reporter
आता सभासद आणि कामगारांना मिळणार महिन्याला फक्त १ लिटर सॅनिटायझर, 'सोमेश्वर' चा निर्णय

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

सोमेश्वर कारखान्याचे सभासद व कामगारांना प्रतीमहा एक लिटर या प्रमाणात साखर कार्डवर नोंद  करुन सॅनिटायझर मिळणार आहे. सभासदांनी मागणी केल्यास पुढील पाच महिन्याचे सॅनिटायझर एकाच वेळी देण्याचा निर्णय दि २३ पासून घेण्यात आला आहे. 
जाहिरात
           याबाबत कारखान्याने परिपत्रक काढले आहे, यात म्हनटले आहे की,  कारखाना डिस्टीलरीमधून सॅनिटायझरचे उत्पादन घेत आहोत व या उत्पादनास 'श्री सोमेश्वर हॅण्ड सॅनिटायझर' असे नाव दिलेले आहे. हॅण्ड सॅनिटायझरचे
उत्पादनाचा फूड ड्रग्ज व कॉस्मेटिक अॅक्टमध्ये समावेश असलेने याची सभासदास अगर विक्रेत्यास विक्री करताना खालील नियमांचे पालन करणेचे आहे, यामध्ये  मेडिकल स्टोअर्स/ मेडिकल होलसेलर्स यांना हॅण्ड सॅनिटायझरची विक्री करताना त्यांचेकडील ड्रग्ज लायसन्स (नूतनीकरण केलेले), जी.एस.टी. नंबर यांची झेरॉक्स प्रत घेऊन व विक्री रक्कम एन.ई.एफ.टी./ आर.टी.जी.एस. व्दारे घेवूनच
विक्री करावयाची आहे, कारखाना सभासद व कामगारांना प्रती महा एक लिटर या प्रमाणात साखर कार्डवर मागणी करुन सॅनिटायझरची विक्री चालू माहे मे २०२० पासून करणेचीआहे. 
जाहिरात
फक्त सभासदाने मागणी केलेस एका वेळी जास्तीत जास्त पाच महिन्याचे पाच लिटर इतके सॅनिटायझर दिले जाईल. ज्या महिन्यात सभासद सॅनिटायझर नेणेस येईल त्या महिन्यापासून पुढे पाच महिन्याचे सॅनिटायझर दिले जाईल. कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत)सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय संस्था यांना त्यांची मागणी लेटरपॅडवर घेऊन सॅनिटायझरची विक्री करावयाची आहे. असे परिपत्रकात म्हनटले आहे.
To Top