मुर्टीत अजून एक कोरोना पॉझिटिव्ह, बारामती तालुक्याची संख्या १३ वर

Pune Reporter
2 minute read
मुर्टीत अजून एक कोरोना पॉझिटिव्ह, बारामती तालुक्याची संख्या १३ वर

बारामती - प्रतिनिधी
हेमंत गडकरी
मुर्टी (ता. बारामती ) येथील आधीच्या कोरोना रुग्णाचा मुलगाही आता कोरोना बाधित निघाला आहे त्यामुळे बारामती तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता १३ वर पोहोचली आहे.
       मुंबई वरून आपल्या मूळ गावी आलेल्या एका व्यक्तीची तब्बेत बिघडल्याने त्याची गावातच तपासणी करून उपचार करण्यात आले होते मात्र त्यानंतर ही त्याला बरे न वाटल्याने मोरगाव येथे नेऊन त्याची तपासणी करण्यात आली त्यावेळी शंका आल्याने त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यात तो व्यक्ती कोरोना संक्रमित आढळला. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पावले उचलत त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ११ जणांचे स्वॅब तपासणी साठी पाठवले होते. त्यातील नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते त्यामुळे तालुक्याने सुटकेचा निःश्वास टाकला होता मात्र उर्वरित दोन जनांपैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह तर दुसऱ्या  रुग्णाचा रिपोर्ट कोरोना पोझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुर्टी गावाची सीमा सील करण्यात आली असून गावाची महसुली सीमा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.
जाहिरात
To Top