पुणे जिल्हा मार्ग क्रमांक 65 वरील मोरगांव ते बारामती या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू

Pune Reporter
पुणे जिल्हा मार्ग क्रमांक 65 वरील मोरगांव ते बारामती या  रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू

मोरगाव  प्रतिनिधी  दि :२० मे

पुणे  जिल्हा मार्ग क्रमांक 65 वरील मोरगांव ते बारामती या  रस्ता रुंदीकरणाचे काम  सध्या सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साधारण:  साडेतीन फूट अंतराचे  डांबरीकरण होणार असल्याने रस्ता तीन पदरी होणार आहे  .मात्र या डांबरीकरणासाठी १०  फुटावरील झाड काढण्याचा अट्टाहास सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केला आहे .  वृक्षतोडीमुळे  या मार्गावरील झाडाखाली व्यवसाय करणाऱ्या पन्नासपेक्षा अधीक तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड व प्रजन्य मानावरही परीणाम होणार आहे  .
जाहिरात
        तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या १५ वर्षापासून गतवर्षाचा अपवाद वगळता अत्यल्प पाऊस होत आहे . पाऊस कमी होण्यामागे असलेल्या अनेक  कारणापैकी  वृक्षतोड हे प्रमुख कारण मानावे लागेल . होत आहे .   पुणे जिल्हा मार्ग क्रमांक ६५  वरील मोरगांव  पासून ते बारामती पर्यंत रस्ता  तिनपदरी होत आहे . रुंदीकरणासाठी मुख्य रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजुच्या साईट पट्ट्यांवर साधारणत: साडेतीन ते चार  फुट डांबरीकरण केले जाणार आहे . या रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांचे  अधिकचे  क्षेत्र संपादित न करता फक्त दोन्ही बाजूने  रुंदीकरण होत  आहे. मात्र  नव्याने होत असलेल्या  रस्त्यापासून 10 फूटलांब  अंतरावर असलेले  साठ वर्षापेक्षाही  जुनी असलेली शेकडो बाबळीच्या वृक्षांची तोड   का सुरु  आहे ? हा प्रश्न अनुत्तरित आहे .
         साडेतीन फूट रस्त्यासाठी दहा फूट अंतरावरील झाडे काढायचं काम  असल्याने शेतकरी व पर्यावरणप्रेमींकडून तिव्र संताप  व्यक्त होत  आहे. गावोगावी  बांधावरील होणारी वृक्षतोड  व आता रस्त्याचे बाजूवरील वृक्षतोड यामुळे या भागात भविष्यात पावसाचे कमी प्रमाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे काही तज्ञांचे मत आहे. 
          वृक्षतोडीमुळे झाडांवरील शेकडो पक्षांची घरटी व थांबे उध्वस्त होत आहे . यामुळे ही वृक्षतोड ताबडतोब थांबवावी अशी मागणी अनेक तरुण पर्यावरणप्रेमींकडून होत  आहे  .रस्त्याच्या बाजुची अशी झाडे काढल्यास वाटच्या वाटसरूला व एकही चितपाखरु थांबण्यास आधार राहणार नाही हे मात्र निश्चित आहे .

-------------
तरडोली ता . बारामती येथील अनेक शेतकऱ्यांना सन १९७२ पुर्वी झालेल्या  या  रस्ता अधीग्रहणाचा कुठलाही मोबदला न देता  डांबरीकरण केले आहे .त्यातच रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली   बांधापासुन जवळच असलेली झाडे तोडल्यास येथील शेतकरी व व्यवसाईक आंदोलन करणार आहेत .
To Top