पुरंदर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला.
वीर गावातील एका युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह.
नीरा : प्रतिनिधी
पंचावन्न दिवस लॉकडाऊन काटेकोरपणे पालन करत पुरंदरच्या प्रशासनाने पुरंदरचा गढ शाबुत ठेवला. पण महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आणि पुरंदर तालुक्यातील कोरोनाचा शिरकाव झाला.
पुरंदर तालुक्यातील वीर गावातील मुळचा रहिवासी असलेला युवक काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीसांत रुजु झाला होता. काही दिवसांपूर्वी तो मुळ गावी वीर येथे आला. त्याला सर्दी खोकला ताप असल्याने खाजगी दवाखान्यात उपचार घेतले. संबंधित युवकाने खाजगी लॉब मध्ये कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा रिपोर्ट आज बुधवारी सायंकाळी आला असल्याचे पुरंदरच्या प्रशासनाने सांगितले आहे.
रुपाली सरनोबत
तहसीलदार पुरंदर
वीर गावातील एका व्यक्तीने खाजगी कोरोना टेस्ट केली होती. ती पॉझिटिव्ह आहे. प्रशासनाने तात्काळ खबरदारी चा उपाय म्हणून त्यांना ट्रिपल सी सेन्टर ला ठेवणार आहे. उद्या त्यांचा स्वॅप घेऊन पुन्हा तपासणी करीत पाठविणार आहोत.