सोमेश्वर कारखान्याने सभासदांना सॅनिटायझर मोफत वाटप करावे :- श्री सतिश काकडे
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांनी कारखान्याच्या सभासदांना सॅनिटायझर मोफत वाटप करावे अशी मागणी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी केली आहे.
जाहिरात
याबाबत काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हनटले आहे की, कारोना विषाणुच्या साथीमुळे महाराष्ट्र राज्य गेली ८ आठवडे बंद आहे, लॉकडाउन आहे. केंद्र सरकारने व राज्य सरकारने याची गंभीर दखल घेवुन संपुर्ण राज्य लॉकडाउन केले आहे. यामुळे या महामारीचे संकट दुर होण्याकरीता पंतप्रधान मोदी साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे सर्व सहकारी मंत्री यांचे शेतकरी कृती समिती समर्थन करीत आहे व अभिनंदन ही करीत आहे. तसेच सर्व पोलीस खाते, आरोग्य खाते. व सर्व खात्यातील अधिकारी यांचे ही अभिनंदन व आभारी आहे. आज पुणे जिल्हयात कोरोना या विषाणुने थैमान घातले आहे व अलीकडे बारामती शहरात देखील या विषाणुचा फैलाव झाल्याने ग्रामीण भागात याचा फैलाव होवु नये याची काळजी घेतली पाहिजे. म्हणुन सरकारने अनेक खाजगी व सहकारी कारखान्यांना सॅनिटायजरची निर्मीती करण्याची परवानगी दिली आहे. तसे आदेश देखील कारखान्यांनाकेले आहेत.
जाहिरात
आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने देखील गेली दिड महिन्यापासुन सॅनिटायजरचे उत्पादन
करण्यास सुरवात केली आहे. तसेच कारखान्याने त्याची विकी देखील सुरू केली आहे व त्याची किंमत कारखाना पंचकोशीतील ग्रामपंचायतला १०० रू प्रति लिटर दराने व बाहेरील लोकांना १२५ रू. प्रति लिटर प्रमाणे विक्री करत आहात अशी माहिती मिळाली आहे ते योग्य नाही. आम्ही निंबुत गावामध्ये ग्रामपंचायत निबुत, भैरवनाथ देवस्थान फंड व भैरवनाथ यात्रा कमेटी यांच्या माध्यमातुन गावातील सर्व १३५० कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे ५७०/- रू. प्रमाणे घरटी मोफत किराणा सामानाचे घरपोच वाटप केलेले आहे. तसेच ज्युबिलीयंट या खाजगी कंपनीस गावातील ग्रामस्थांनी विनंती केली असता भागातील गावामध्ये राहत असलेल्या नागरीकांसाठी तात्काळ मोफत १३० लिटर (१०० मि.ली प्रमाणे)सॅनिटायझरचे वाटप करण्यात आलेले आहे.
तरी संचालक मंडळाला कृती समितीच्या वतीने आवाहन करण्यात येते की सर्व सभासद व त्यांच्या कुटूंबा करीता किमान १ लिटर एवढा सॅनिटायजरचा पुरवठा मोफत करण्यात यावा. १ लिटर सॅनिटायजरसाठी १००/- रू. खर्च येतो मग २७ हजार सभासदांना मोफत सॅनिटायजर देण्यासाठी २७ लाख रूपये खर्च येईल. केंद्र सरकार, राज्य सरकार व सामाजिक संस्था देखील कोरोना या आजाराशी लढण्यासाठी करोडो रूपयांचा निधी खर्च करीत आहेत मग आपल्या कारखान्याने सभासदांच्या आरोग्यासाठी मोफत खर्च केल्यास काय फरक पडतो. चेअरमन यांना आपल्या सोईनुसार ४० लाखांची गाडी खरेदी करायला परवानगी आहे. तिचा VIP नंबर घेण्यासाठी १ लाख ५० हजार रूपये कारखान्याचे जादा खर्च करून नुकसान केलेले चालते, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री यादव यांची बडदास्त करण्यासाठी १८ लाख रूपये किमतीची क्रियेटा गाडी खरेदी केलेली चालते, मग सभासदांना सॅनिटायजर मोफत द्यायला का जमत नाही? कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, कारखान्यावर कर्ज नाही मग सभासदांना त्यांच्या आरोग्याची काळजी करून तात्काळ सॅनिटायजरचा पुरवठा विना विलंब करायला काय हरकत आहे? का चेअरमन व M.D यांना त्यांचे हित दिसत नाही? म्हणुन कारखाना वार्षिक सभेच्या खाऊचे पुडे घरोघरी जावुन पोहच करतो मग सभासदांच्या आरोग्यासाठी सॅनिटायजरचा पुरवठा घरोघरी करायला ज्योतिषाला विचारायला हवे की काय? सोमेश्वर सह साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे तो चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्या मालकीचा नाही याचे भान चेअरमन यांनी ठेवावे. कारखाना चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्या मालकीचा आहे की काय? असा संभ्रम सभासदांच्या मनात निर्माण झाला आहे. सभासदांना साखर देताना देखील चेअरमन यांनी असाही दुजाभाव केला होता. दिपावलीला सुरवातीला १० किलो साखर देता व नंतर मनमानी करून ३० किलो साखर दिली होती. तेव्हा साखर आयुक्त साो. यांची परवानगी घेतली होती का? अशा पध्दतीने वार्षिक मिटींग मध्ये कोणतीही चर्चा न करता निर्णय घेता व नंतर प्रोसिडीग बोगस करता हे आता थांबवावे.
तरी कृती समितीच्या निवेदनाची दखल घेवुन सभासदांना तात्काळ सॅनिटायजरचे मोफत घरपोच वाटप कारखान्याच्या यंत्रणे मार्फत करण्यात यावे, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.