सोमेश्वरनगर प्रतिनिधी
निंबुत ता बारामती येथील गौतमभैय्या काकडे युवा मंच् यांच्या वतीने व एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन च्या सहकार्याने १६० पोलीस बांधवांना ड्रायफ्रूट, मास्क आणि गोळ्यांचे वाटप वाटप करण्यात आले.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, जेजुरी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने तर लोणंद येथील पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांचेकडे हे साहित्य सोपवण्यात आले.
यावेळी गौतम काकडे, दिग्विजय जगताप, जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, adv. नवनाथ भोसले, पत्रकार युवराज खोमणे, विनोद गोलांडे, तुषार धुमाळ, अमर होळकर, निरा येथील पत्रकार राहुल शिंदे, भरत निगडे, निंबुत चे सरपंच उदय काकडे, वाघळवाडी चे उपसरपंच जितेंद्र सकुंडे लोणंद येथील पत्रकार प्रशांत ढावरे त्यांचे सर्व सहकारी मित्र आदी मान्यवर उपस्थित होते.