पुरंदर मध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह
नामांकित औषध निर्माण करणा-या कंपनीतील कामगार.
पुरंदर : प्रतिनिधी
कोरोनाचे धुके पुरंदर वर दाटुन येते असलेल्याचे जाणवु लागले आहे. मागील आठवड्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. तर या आठवड्याच्या सुरुवातीला अजै तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. नामांकित औषध निर्माण करणा-या कंपनीतील (सिरम) दोन व्यक्तींचे स्वॉप पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती पुरंदरच्या प्रशासनाने दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील सिरम कंपनीमध्ये काम करणारे सासवड येथील एक व जवळार्जुन येथील एक असे दोन रुग्णांचे काल रात्री कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पुढील कार्यवाही करणेत येत आहे. अशी माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी आज बुधवारी सकाळी दिली आहे.
यावरून पुन्हा असे अधोरेखित होत आहे की कामानिमित्त बाहेर गेलेल्या लोकांनाच कोरोनाचा संसर्ग होत आहे. सर्व दक्षता घेत उत्पादन घेणाऱ्या कंपनीचे कर्मचारीच बाधित होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी या काळात काय भुमिका घ्यावी हे ठरवावे. यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल केला असला तरी आपल्या वावरण्यावर मर्यदा ठेवने गरजेचे आहे. घरीच रहा तीच एकू सुरक्षित जागा आहे असे आवाहन सोमेश्वर रिपोर्टर आपल्याला करत आहे.
जाहिरात