डॉ .रुपेश जगताप मित्र परिवाराच्या वतीने वाकी गावात गोळ्यांचे वाटप
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
वाकी ता बारामती येथील डॉ रुपेश जगताप व मित्र परिवाराच्या वतीने संपूर्ण वाकी गावाला arsenicumalbum30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
१७६३ लोकसंख्या असलेल्या वाकी गावात ३६५ कुटूंबाना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस बांधवांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस शरद वेताळ, विठ्ठल कदम तसेच डॉ रुपेश जगताप, सुमित जगताप, अक्षय गाडे, स्वप्नील गाडेकर, विशाल जगताप, ऋत्विक गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जाहिरात