पुरंदरला लागलेले ग्रहण दाटू लागेल आहे.

Pune Reporter
पुरंदरला लागलेले ग्रहण दाटू लागेल आहे.

पुरंदर :प्रतिनिधी 
       शासनाने सांगून पाहिले, समजवून पाहिले पण लोकांमधील लॉकडाऊनमध्ये काय होतंय हे पाहण्यासाठी आतुरता निर्माण होत चालली आहे. त्यामुळे निष्काळजीपणा वाढत गेला आणि जे नको तेच झाले.  काल (दि. 26) रोजी रात्री पुन्हा दोन कोविड पोजिटीव्ह रुग्णामध्ये वाढ झाली असून त्यामध्ये हडपसर येथील नामांकित औषध बनवणाऱ्या कंपनीमधील रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती आता तीन वर गेली आणि उर्वरित दोन जण हे पोलीस दलातील जवान आहेत. 

          दि. २६ रोजी आलेल्या पोजिटीव्ह रुग्णांपैकी एक सासवडमधील लांडगेआळीतील तर दुसरा जवळार्जुन येथिल चोरवाडीतील आहे. सासवडमधील रुग्णाचा पोजिटीव्ह सापडल्याची बातमी कळताच सकाळपासून नगरपरिषद, सासवडने सर्व सासवड बंद करण्यास सुरुवात केली व पाहता-पाहता सासवड लॉकडाऊन झाले. 
जाहिरात
             कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुरंदरच्या तहसीलदार श्रीमती रूपाली सरनोबत यांनी आज जवळार्जुन येथील चोरवाडी येथे भेट दिली. चोरवाडी येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्यामध्ये सात जन हाय रिस्क तर वीस जणांचा लो रिस्कमध्ये समावेश केला असून हाय रिस्क मधील लोकांना जेजुरी येथील शिवतारा लॉज मध्ये व लो रिस्कमधील लोकांना घरातच विलनगिकरण करण्यात आले आहे.  तर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून चोरवाडी, संजोबाचा मळा, व बफर झोनमध्ये मावडी कडेपठार गावठाण, जवळार्जुन, विठ्ठलवाडी, राणेवस्ती, आरंदीचा मळा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अशी माहिती तहसिलदार श्रीमती रुपाली सरनोबत यांनी दिली. 
जाहिरात
         यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक अबनावे, जेजुरी पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. अकुंश माने, उपनिरीक्षक श्री. सोनवलकर, मंडळ अधिकारी श्री. गोपाळ लाखे, तलाठी श्रीमती शीतल खराद, श्री. हमीद शेख आदी उपस्थित होते.
To Top