सोमेश्वर पत्रकार ग्रुप ला मास्क ,ड्रायफुट व औषधे वाटप .. गौतमभैय्या काकडे मंचची बांधीलकी

Pune Reporter
सोमेश्वर पत्रकार ग्रुप ला मास्क ,ड्रायफुट व औषधे वाटप .. गौतमभैय्या काकडे मंचची बांधीलकी..

सोमेश्वरनगर   प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील" एक हात मदतीचा "या सामाजीक संस्थेचे  अध्यक्ष  गौतम भैय्या काकडे त्यांचे सहकारी दिग्विजय जगताप ,ॲड.नवनाथ भोसले आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले .
         ऱाज्य सराफ संघटनेचे उपाध्यक्ष किरण आळंदीकर यांच्या उपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडला .यावेळी गौतम भैय्या काकडे यानी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत विविध  सामाजीक कार्याची माहीती दिली . सोमेश्वर पत्रकार ग्रुप चे दत्ता माळशिकारे ,ॲड. गणेश आळंदीकर ,महेश जगताप ,संतोष शेंडकर, युवराज खोमणे ,विनोद गोलांडे,तुषार धुमाळ आदी पत्रकारानी कोरोना लॉकडाऊन मधे  अतिशय मोलाचे योगदान दिले . या ग्रुप च्या सदस्यानी विविध संघटनांच्या मदतीने  हजारो कुटुंबाना धान्य ,किराणा माल त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी ,पोलीस ,पेट्रोलपंप कामगार आदीना सॅनिटायझर चे वाटप केले. येथील नागरीकाना लॉकडावुन मधे अत्यावश्यक सेवेमधे येणाऱ्या अडचणी सोडविल्या. परिसरातील परप्रांतीय ,पारधी ,गरीब व गरजुना मोठ्या प्रमाणात मदत केली. नागरीकाना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री याना प्रत्यक्ष संपर्क करुन सोडवल्या. त्याबद्दल पत्रकारांचे आभार मानुन त्याना ड्राय फ्रूट्स ,मास्क व प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदीक गोळ्या एक हात मदतीचा या संस्थेद्वारे  वाटल्या गेल्या .
     यावेळी सोमेश्वर पत्रकार ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थीत होते .
जाहिरात

जाहिरात
To Top