सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वरनगर या ठिकाणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापा टाकून एक जणाला ताब्यात घेतले आहे.
विश्वास सर्जेराव गायकवाड रा. करंजे असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून रोख ६६० रुपये जप्त करण्यात आले आहेत. सोमेश्वरनगर येथील कारखाना रोडवर मटका सूरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे, पोलीस हवालदार महेंद्र फणसे, पोलीस नाईक काशीनाथ नगराळे, अक्षय सिताप यांनी ही कारवाई केली.
जाहिरात