पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांची गुळुंचे विवाह सोहळ्या विषयी माहिती.

Pune Reporter
पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांची गुळुंचे विवाह सोहळ्या विषयी माहिती.

नीरा :  प्रतिनिधी

सोमेश्वर रिपोर्टरचे प्रतिनिधी व पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्यामधील दूरध्वनीवरील संभाषण 👇


माण तालुक्यातील तहसिलदार यांचा फोन आला होता की येथील एका व्यक्तीचा व महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्या कुटुंबातील व्यक्तींना कॉरंटाइन करण्यासाठी माण प्रशासन गावात सकाळी गेले असता तेथुन हे कुटुंब विवाहासाठी पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथे गेले आहे. आम्हि आमच्या रेव्हिन्युच्या कर्मचार्यांसह जेजुरी व नीरा पोलिसांना गुळुंचे गावात पाठवले. संबंधित व-हाडी सेकंडरी संपर्कातील लोक होते. त्यांनी रितसर लग्नाची परवानगी घेतली होती. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा थोड्याच वेळात संपन्न झाला. कोरोना रुग्ण गुळुंच्यात आला नव्हता. त्यांचे नातेवाईक लग्नाला आले होते. सकाळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना होम कॉर्नाईंन करायचे होते पण ते निघुन गेले होते. त्यांना रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे सकाळ पर्यंत माहिती नव्हते. रिपोर्ट सकाळी सहा वाजता आला आणि शासनाचे लोक घरी जाईपर्यंत हे व-हाड निघाले होते. पुरंदर प्रशासनाने तातडीने जाऊन समजूत काढत लग्न सोहळा उरकुन घेतला आहे. संबंधित संपर्कातील लोकांना होमकॉरंटाईन किंवा प्राथमिक शाळेत ठेवण्यात येईल. आरोग्य विभागाशी बोलणे करुन पुढील कारवाई करण्यात येईल. असे मत पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सोमेश्वर रिपोर्टरच्या प्रतिनिधी कडे व्यक्त केले.
To Top