अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यास १० हजाराची मदत

Pune Reporter
अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यास १० हजाराची मदत

सोमेश्वरनगर   प्रतिनिधी

वाघळवाडी येथील अपघातात मृत्यू पावलेल्या जिल्हा बँक कर्मचारी राजेंद्र भोंडवे याच्या कुटुंबियास जिल्हा बँक कामगार सोसायटीच्या वतीने १० हजार रुपयांची मदत देण्यात आली. 
        दोन दिवसापूर्वी वाघळवाडी या ठिकाणी अपघातात दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे सोमेश्वरनगर परिसरावर शोककळा पसरली होती. यामधील राजेंद्र भोंडवे हा जिल्हा बँकेत चालक या पदावर काम पाहत होता, तर शरद गुळुंबे  हा करंजे विका सोसायटी मध्ये सचिव या पदावर काम पाहत होता. तो सोलापूर आगर प्रमुख रमाकांत गायकवाड यांचा भाचा होता. जिल्हा बँकेत कार्यरत असलेला राजेंद्र भोंडवे याला आज जिल्हा बँक कामगार सोसायटी च्या वतीने १० हजार रुपयांची मदत देण्यात आली. सोसायटीचे संचालक व्ही बी वाघ आणि सोमेश्वरनगर शाखा प्रमुख डी एम गायकवाड यांनी ही मदत भोंडवे कुटुंबियांकडे सुपूर्त केली.

To Top