कोऱ्हाळे बु॥
संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून आतापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त लोकांचा यात मृत्यू झाला आहे. या आजारावर अजून कोणतीही लस अस्तित्वात नसून फक्त सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हा एकमेव उपाय आहे.
जाहिरात
बारामती तालुक्यातील लाटे येथील सामाजिक कार्यकर्ते व श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन (बाबा) खलाटे यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता प्राथमिक आरोग्य उपकेंद्र लाटे यांना तापमान चेक (infrared thermometer) करण्याचे मशीन भेट दिले आहे.
यामुळे आरोग्य कर्मचारी यांना पुणे, मुंबई व इतर ठिकाणाहून आलेल्या लोकांना तपासणी करणे शक्य होणार आहे.