सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने नी दिली गुळुंचेला भेट.

Pune Reporter
सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने नी दिली गुळुंचेला भेट.

नीरा :  प्रतिनिधी


काल एका विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यास मायणी येथुन वर व त्यांचे जवळचे मोजकेच नातेवाईक आले होते. सोमेश्वर रिपोर्टरने याबाबत प्राप्त माहितीनुसार वार्तांकन केले. ती बातमी पुर्ण न वाचता माथळा वाचुन काही गैरसमज पसरले. तसा करण्याचा कोणताच हेतू नव्हता. या संदर्भात पुरंदरच्या प्रशासनाने खबरदारी घेत अधिक माहिती ही दिली. संध्याकाळी पंचायत समितीचे मा. गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, आरोग्य अधिकारी डॉ.विवेक आबनावे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी यांनी भेट दिली. त्यानंतर जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी ही गुळुंचे येथील लगिनघरी भेट देऊन घडलेल्या घटनेचा आढावा घेतला व आपले मत स्पष्ट केले.
          'विवाहसोहळ्याला रितसर शासनाकडून परवानगी दिली होती. नियमा प्रमाणे सर्व झाले आहे.  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती विवाहसोहळ्याला आली नव्हती. ती व्यक्ती पुर्वीच कॉरंटाइन केलील होती. त्यांचा लग्नघरातील कोणाशीही संपर्क आला नव्हता. त्यांचा रिपोर्ट विवाहाच्या दिवशी सकाळी संबंधित प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर वधु व वर पक्षाने काळजी घेत विवाह सोहळा आटोपता घेतला. पोलीस प्रशासना कडुन आव्हान करण्यात येते की गुळुंचे व परिसरातील लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. संबंधीत व्यक्ती गुळुंचे गावात आली नव्हती.
जाहिरात
To Top