वाणेवाडीत मेडिकल आणि किराणा वगळता इतर दुकाने बंद
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
वाणेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व वाड्या वस्त्यांवरील अत्यावश्यक सेवा असलेली मेडिकल आणि किराणा माल दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुर्टी ता बारामती येथे आज एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी उपसरपंच संजय जगताप, माजी सरपंच दिग्विजय जगताप, adv. नवनाथ भोसले, बारामती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, ग्रामसेवक पी के गाढवे, सदस्य शाफिक मुलाणी, सुनील चव्हाण, मिलिंद सटाले, हनुमंत जगताप, अमोल भोसले उपस्थित होते. यामध्ये अत्यावश्यक सेवेत असलेले मेडिकल हे पूर्ण वेळ चालू राहणार असून किराणा माल हे ११ ते ५ या वेळेत चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील निर्णय येईपर्यंत दुकाने बंद ठेवली जाणार आहेत.
तसेच बाहेरील गावावरून येणाऱ्या लोकांना क्वॉरेंटाईन करण्याबाबत आज तातडीने ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविण्यात आली आहे