थोपटेवाडीत राजकीय कुरघोडय़ांना उधाण: गटविकास अधिका-यांचे दुर्लक्ष.

Pune Reporter
थोपटेवाडीत राजकीय कुरघोडय़ांना उधाण: गटविकास अधिका-यांचे दुर्लक्ष. 

 को-हाळे बु॥
 बारामती तालुक्यातील थोपटेवाडीत सध्या राजकीय कुरघोडय़ांना उद्यान आले असून वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. थोपटेवाडी येथील गायरान  गट नंबर १२० मध्ये ७६ एकर जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर  अतिक्रमण झाले असुन काही ठिकाणी सध्या बांधकाम सुरू आहे. मात्र ग्रामपंचायततीने कुरघोडीचे  राजकारण करत स्वताच्या सातबारावरील जागेत बांधकाम करणा-या व्यक्तीलाच बांधकाम बंद करण्याचे नोटीस देवून आकलेचे तारे तोडले आहेत. उठता बसता राजकारण करत असलेल्या सत्ताधा-यांनी गायरान जमिनित बांधकाम सुरू असलेल्यांना आत्तापर्यंत  कोणतीही नोटीस दिली नाही.ही बाब काही सदस्य व नागरिकांनी विस्तार अधिकारी खंडाळे यांच्या कानावर घातली असता विस्तार अधिकारीही बारामतीतूनच सभा हाणुन मोकळे होत आहेत. ग्रामपंचायतीच्या  विविध समस्या , अडीअडचणी यावर पंचायत समिती बारामती  यांच्याकडून अर्जानवर फक्त निळी शाई लावून कागद परत दिला जातो मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही सदर अर्ज हे रद्दी मध्ये विकले की काय असा प्रश्न थोपटेवाडीतील नागरीकांना पडला आहे.  ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार व भोंगळ कारभाराला कंटाळुन  काही सदस्यांसह नागरिकांनी २६ मार्च रोजी उपोषणाचा इशारा दिला होता मात्र कोरोना विषाणूच्या संकटामुळे गटविकास अधिकारी व बारामती पंचायत समितीचे  उपसभापती यांच्या विनंतीला मान देऊन हे उपोषण स्थगित करण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविषयी नागरिक वरिष्ठांना वेळोवेळी तोंडी व लेखी कल्पना देत असून सुद्धा विस्तार अधिका-यांसह गटविकासअधिकारी मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत. मागील १० वर्षा पूर्वी ही असेच ग्रामपंचायत मार्फत ७ लोकांना नोटिसा देऊन २ बांधकाम काढण्यात आली होती वास्तविक पाहता सदर १२० गट हा सर्व ७६ एकर गायरान असून त्यामध्ये तब्बल २५० च्या वर घरांच्या अनियमित अतिक्रमित म्हणून नोंदी आहेत.
राजकीयदृष्ट्या आणि विनाकारण सूडबुद्धीने  नोटिसा दिल्या जात असतील तर लवकरच या २५० लोकांच्या बेकायदेशीर अनियमित घरांनवर हातोडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी असून  राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रत्यक्ष भेटून गावातील भ्रष्टाचाराबाबत व भोंगळ कारभाराविषयीचा पाढा वाचून वरिष्ठ अधिकाऱयांची तक्रार करणार असल्याची माहिती थोपटेवाडीतील नागरिकांनी दिली आहे .
जाहिरात
जाहिरात
To Top