लोणीभापकर येथील महाराजांचा कोरोनावर लस बनवल्याचा दावा
लोणी भापकर येथील पांडुरंग महाराजांनी तयार केले कोरोनावरती औषध
वनस्पती औषधांपासून बनवली आहे ही लस या औषधाने कोरोना पेशंट बरा होऊ शकतो असा दावा
लोणी भापकर : प्रतिनिधी
काशीनाथ पिंगळे
गेली १५ वर्षापासून पांडुरंग महाराज हे लोणीभापकर या ठिकाणी रहात आहेत. ते १०-११ वर्षापासून या औषधप्रक्रिया क्षेत्रात काम करीत आहेत. सर्दी, खोकला, घसा खवखवणे, मुळव्याध, मणके, सांधेदुखी, पाठदुखी, शरीरातील कमकुवत हाडे, पोटातील विकार अशा विविध आजारांवरती त्यांनी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या औषधांचा वापर केला आहे व अनेक रूग्णांना यामुळे फरक पडला आहे. तसेच मी बनविलेलया या औषधाने कोरोनाचा पेशंट बरा होऊ शकतो असा माझा दावा आहे असेही पांडुरंग महाराजांनी यावेळी सांगितले.
तुळस, अश्वगंधा, कडूनिंब, गोमूत्र व इतर विविध औषधी वनस्पतींचा (बाष्पीभवन) ऊर्ध्वपतन पद्धतीने अर्क बनविला जातो. या अर्कामध्ये रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद आहे. तसेच कोरोना संसर्ग असणाऱ्या रुग्णांमधील विषाणू मारण्याची ताकद देखील असल्याचा दावा या महाराजांनी केला आहे.
केंद्र व राज्य सरकार तसेच आरोग्य विभागाने या औषधाची प्रयोगशाळेत तपासणी करावी व कोरोना संसर्ग असणाऱ्या रुग्णास हा अर्क दिल्यास तो पूर्ण बरा होईल असा दावा या महाराजांनी केला आहे. या महाराजांनी तयार केलेली लस ही शासनाकडे सुपूर्त करण्याची त्यांची इच्छा असून ती योग्य त्याठिकाणी तपासून कोरोना पेशंटवर वापरावी अशी ईच्छा व्यक्त केली आहे. तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पांडुरंग महाराज यांनी केली आहे.
जाहिरात