दिलासादायक.... वडगाव नि. ला आलेल्या ७० वर्षाच्या आजींची कोरोनावर मात
ठणठणीत बरे होऊन परतल्यया घरी
वडगाव निंबाळकर प्रतिनिधी
संतोष भोसले
वडगांव निंबाळकर येथील कोरोनाबाधित सत्तर वर्षाच्या आजींची कोरोनावर मात, ठणठणीत बरे होऊन ससून रुग्णालयातुन घरी परतल्या असल्याची माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती तालुक्याती वडगाव निंबाळकर येथील जगताप वस्तीवर मुलीला भेटण्यासाठी संबंधित महिला 15 मे रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबईहून आली होती. दरम्यान तिला यापूर्वीच ताप येत होता. घशातही खो- खो होत होती. पेशी कमी झाल्याने हवापालट करण्यासाठी मुंबईहून वडगावला त्या आल्या होत्या. मात्र, येथेही त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्याला नेण्यात आले. ससूनमध्ये त्यांची तपासणी केली असता, त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील 12 लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील बारच्या बारा जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने वडगाव निंबाळकर गावासाठी, बारामतीकरांसाठी ही दिलासादायक बातमी आली. दहा दिवस ससून रुग्णालयात उपचार घेत सत्तर वर्षाच्या आजींची कोरोनावर मात करून ससून रुग्णालयातुन घरी परतल्या आहेत.