पुन्हा एक दिलासादायक बातमी....मुर्टीतील पितापुत्राची कोरोनावर मात
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
मुर्टी (ता. बारामती ) येथील मुंबई वरून आलेल्या पितापुत्राने कोरोनावर मात केली असून आज त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
मुंबई वरून आपल्या मूळ गावी आलेल्या एका व्यक्तीची तब्बेत बिघडल्याने त्याची गावातच तपासणी करून उपचार करण्यात आले होते मात्र त्यानंतर ही त्याला बरे न वाटल्याने मोरगाव येथे नेऊन त्याची तपासणी करण्यात आली त्यावेळी शंका आल्याने त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यात तो व्यक्ती कोरोना संक्रमित आढळला. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरच्यांची तपासणी केल्या नंतर त्या व्यक्तीचा मुलगा कोरोना बाधीत निघाला होता, त्या दोघांवर उपचार सुरू होते. मात्र आज त्या दोघा पिता पुत्राने कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.