'सोमेश्वर' चे संचालक महेश काकडे यांची सामाजिक बांधिलकी

Pune Reporter
'सोमेश्वर' चे संचालक महेश काकडे यांची सामाजिक बांधिलकी


सोमेश्वरनगर   प्रतिनिधी

सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक महेश काकडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत गेल्या  दहा वर्षापसुन मुस्लिम समाजाला ईद निमित्त साखरेचे वाटप करत आहेत.
          निंबुत ता बारामती येथील महेश काकडे हे गेल्या दहा वर्षांपासून ते निंबुत परिसरातील ५० कुटूंबाना पाच किलो प्रमाणे साखरेचे वाटप करून त्यांची ईद गोड केली जात आहे. तसेच भटक्या लोकांसाठी मदतीचा हात देण्यात ते नेहमी अग्रेसर असतात.  तसेच गेल्या वर्षी त्यांनी राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजनही केले होते.
जाहिरात
जाहिरात
To Top