वाणेवाडीच्या कॉर्पोरेशन बँकेतील कर्मचारी कॅशिअर का टेलिफोन ऑपरेटर?

Pune Reporter
वाणेवाडीच्या कॉर्पोरेशन बँकेतील कर्मचारी कॅशिअर का टेलिफोन ऑपरेटर?

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

वाणेवाडी ता बारामती येथील कार्पोरेशन बँक ही असून अडचण आणि नसून खोळंबा अशी गत झाली आहे. शासनाच्या विविध योजनांची कर्जेच काय रोजची कॅश देखील तोंडे पाहून दिली जाते. या बँकेतील कॅशियर नक्की कॅशियर आहे का फोन ऑपरेटर हेच ग्राहकांना समजेना, बँकेच्या कामकाजाच्या वेळात याच्या कानाला नेहमीच फोन असतो. तर दुसरीकडे कुठलीही कर्जे देताना ही बँक तोंडे पाहून कर्ज देत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. गेल्याच वर्षी या बँकेने बोगस मुद्रा लोण वाटप करून लाखो रुपयांचा चुना लावून घेतला आहे. 

          बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील कॉर्पोरेशन बँकेची शाखा आहे हि बॅक याना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहिले आहे .मग तो कर्ज वाटपात दुजाभाव असेल ,कर्ज प्रकरणाचा घोळ किंवा  कर्जवाटपातील दलालांची दलाली असेल किंवा कामचुकार कर्मचाऱ्यांची मुजोरी असेल. या कॉर्पोरेशन  बँकेतील  कॅशिअर सोमेश्वरनगर परिसरातील एका गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीचा पति हा कर्मचारी बँकेत कामावरती आल्यानंतर सतत आपल्या मोबाइलमध्ये गुंतलेला असतो तासंतास फोनवर तो बोलत असतो बँकेतील कॅश काऊंटर हे अति महत्त्वाचे मानले जाते येथे शांतता संयम व एकाग्रता ही महत्त्वाची असते  त्याच बरोबर प्रशासनाकडूनच कॅश काऊंटर जवळ मोबाइल फोनचा वापर करू नये व मोबाइलवर ती बोलू नये अशाही सूचना दिल्या असतात पण या बँकेतील कर्मचारी या सूचनांना हरताळ फासत आहे गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित कर्मचाऱ्यांबाबत अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत त्याच्या स्वतःच्या मोबाईलवर बोलण्यामुळे बँकेतील ग्राहकांना त्यांचे व्यवहार करताना अडचण निर्माण होतात व विलंब होत असतो त्यामुळे संबंधित कर्मचारी हा पगार बँकेचा घेतो व काम दुसरेच करत बसतो अशी चित्र दिसत आहे   

कर्ज पाहिजे भिक नको !

एकीकडे संपूर्ण जग कोरोणा रोगांशी लढा देताहेत .देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ,देशाच्या अर्थमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवनवीन उद्योग निर्माण व्हवेत म्हणून उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व  बेरोजगारी कमी होण्यासाठी बँकांना कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले तशी तजबीज अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आली आहे . लघु मध्यम व अन्य व्यवसायासाठी बँकांनीही लवकर कर्जाची पूर्तता करावी असे आदेश आहेत.
लोक डाऊनमुळे अनेकांचे हातचे काम सुटले आहे त्यामुळे शहर सोडून लोक आपल्या मूळ गावी परत येऊ लागले त्यांना हातचे काम सुटले आहे त्यामुळे अंगी असलेले गुण कौशल्याचा वापर करत या परिस्थितीमध्ये पूरक अशा व्यवसाय चालू करायचा त्यासाठी अनेक तरुणांनी आता आपल्या व्यवसायाला या उद्योगाला आर्थिक हातभार लागावा व नवीन उद्योग  उभारावा म्हणून बँकांकडे कर्ज प्रस्ताव सादर करीत आहेत  पण संबंधित शाखा प्रमुख पहिले प्रस्ताव पेंडिंग आहेत त्यांना  मंजुरी आली नाही माझ्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. मी फक्त प्रस्ताव पाठवतो मंजूर मुख्य कार्यालयातून येते असे सांगितले जाते मग यांना काहि अधिकार नसतील तर संबंधित शाखा प्रमुखाला ऐवढे मासिक वेतन घेण्याचा अधिकार काय आहे? हे काम कोणीही करू शकते असा सवाल आता बँकेचे ग्राहकांनी उपस्थित केला आहे .कर्ज मागणीसाठी बँक शाखेमध्ये सारख्या खेट्या घाला लागतात. यामुळे नक्की ही राष्ट्रीयकृत बँक आहे की खाजगी बँक असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे.
जाहिरात


जाहिरात
To Top