सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या सॅनिटायझर विक्री केंद्रावरती प्रशासनाकडून ताळमेळ व नियोजन नसल्यामुळे खरेदी केंद्रावर गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंग’ पुरता फज्जा उडाला आहे.
कोरोनाच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर जगभरामध्ये सॅनिटायझर ची मागणी वाढली त्याची पूर्तता करण्यासाठी साखर कारखान्यांनाही प्रशासनाकडून निर्मिती करण्याची मान्यता देण्यात आली .सोमेश्वर कारखान्याने ही सक्रिय भागा घेतला व सॅनिटायझर निर्मिती सुरू केली आहे हे सॅनिटायझर सभसदांना मिळावे म्हणून त्याची विक्री सुरू केली आहे .
जाहिरात
पण कारखाना प्रशासनाकडून करण्यात आलेली ढिसाळ नियोजन त्याच बरोबर विक्री केंद्राची होत असलेली जागांबद्दल ,नियम व अटी यामुळे सभासद पुरते हतबल झाला आहे .सॅनिटायझर विक्री केंद्राची तीन वेळा जागा का बदलली ?
सोमेश्वर ने सॅनिटायझर निर्मिती सुरू केल्याने त्याची विक्री सभासदांसाठी उपलब्ध करून दिली प्रथम सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करत सोमेश्वर विद्यालयांमध्ये विक्री केली त्यानंतर दुसऱ्यांदा सोमेश्वर कारखान्याच्या स्टोअरमध्ये विक्री करण्यात आली व पुन्हा जागा बदल करत कारखान्याच्या बाहेरील बाजूस गाडी तळाच्या जवळ असणाऱ्या एका ऑफिसमधून आता ही सॅनिटायझर विक्री करण्यात येत आहे कोरोना रोगाचा संसर्ग वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी नियमावली जारी करण्यात आली आहे त्या नियमांचे या केंद्रावर ते पालन केले जात नसल्याचे चित्र आहे सॅनिटायझर खरेदी करत असताना लोकांच्यात सुरक्षित अंतर राहिले पाहिजे . प्रशासनाकडून वेळोवेळी जागा बदल केल्यामुळे ही सभासद त्रस्त आहेत.
जाहिरात
सोशल डिस्टन्स ठेवणार, कारखाना प्रशासनाचा 'वादा फोल'
ज्यावेळी सोमेश्वर कारखान्याने सॅनिटायझर चे उत्पादन घेतले त्यावेळी तीन फुटाचे सोशल डिस्टन्स ठेऊन हे सॅनिटायझर वाटप करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते, त्यासाठी एक महिना सभासदांची साखर पण बंद केली होती. सुरुवातीला सोशल डिस्टन्स ठेऊन सॅनिटायझर वाटप केले असले तरी आता मात्र त्याचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.