१० मे नंतर बारामती तालुक्यात २३४९ जण होम क्वारेंटाईन

Pune Reporter
१० मे नंतर बारामती तालुक्यात २३४९ जण होम क्वारेंटाईन

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

बाहेरील जिल्ह्यातून बारामती तालुक्यात २ हजार ३४९ लोकांना होम क्वारेंटाईन करण्यात आले असल्याची माहिती तालूका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
जाहिरात
           लोकडाऊन शिथिल केल्यानंतर पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून १० मे नंतर २३४९ लोक आले आहेत, या सर्वांना आरोग्य विभागाने होम क्वारेंटाईन करण्यात आले आहे. बारामती तील सर्व चेकपोस्ट वर १ हजार ६१२ लोकांची नोंद झाली आहे. या सर्व १६१२ लोकांना नोटिसा देण्यात आल्या असून टेम्परेचर तपासून त्यांना शिक्का मारून होम क्वारेंटाईन केले आहे. उर्वरित ७३७ लोकांनाही ज्या त्या ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाच्या मदतीने शिक्के मारून नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांनाही  होम क्वारेंटाईन करण्यात आले आहे. तसेच काही ग्रामपंचायतीने बाहेरील गावावरून येणाऱ्या लोकांना गावातील प्राथमिक शाळेत क्वारेंनटाईन केलेले आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ खोमणे यांनी दिली.
जाहिरात

To Top