अत्यावश्यक वस्तुंचे वाटप; एक हात मदतीचा
नीरा :दि१३ प्रतिनिधी
कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लोकांना अन्नधान्याची टंचाई भासू लागली आहे. अत्यावश्यक वस्तु मिळणे कठीण झाले आहे. तालुक्यातील अतादुर्गम भागात याचे आता परिणाम जाणवू लागले आहेत. एक हात मदतीचा या हेतूने लोकांना काही आधार मिळावा यासाठी अजित युवा प्रतिष्ठानच्या वतीने अतिदुर्गम भागात अत्यावश्यक वस्तुंचे किट वाटप करण्यात आले.
जाहिरात
आज बुधवारी कर्नलवाडी (ता.पुरंदर) तांडावस्ती असलेल्या झिरपवस्ती येथील गरीब व गरजू कुटुंबांना अजित युवा प्रतिष्ठान व पुरंदर-हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या वतीने सुमारे ५० कुटुंबांना किराणा किटचे वाटप युवा नेते अजिंक्य टेकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये तुरडाळ, हरभरा डाळ, शेंगदाणे, मटकी, चवळी, तेलपुडा, साखर, चहापत्ती, विविध प्रकारच्या मसाले असे साहित्य वाटप करण्यात आले
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉ.पुरंदर तालुकाध्यक्ष पुष्कराज जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष संदेश पवार, कर्नलवाडीचे सरपंच सुधीर निगडे, या उपसरपंच भरत निगडे, अध्यक्ष बापुराव भोसले, पृथ्वीराज निगडे, किरण गदादे, विशाल भोसले, अशोक रासकर, दिपक भोसले यांनसह कर्नलवाडी-झिरपवस्ती येथील ग्रामस्थ उपस्थित होते.