रुग्णवाहिकेच्या चालकाचा प्रामाणिकपणा, पाच हजार रुपये केले परत

Pune Reporter
रुग्णवाहिकेच्या चालकाचा प्रामाणिकपणा, पाच हजार रुपये केले परत

मोरगाव- दि:१३ प्रतिनिधी, मनोहर तावरे

बारामतीच्या मोरगाव येथे एटीएम मशीन मधून मागणी नसताना थेट पाच हजार रुपये  रक्कम आल्याचा प्रकार काल घडला आहे. तांत्रिक बिघाडामुळे गावातीलच एका तरुणाचे ते पैसे अडकले होते. मात्र आरोग्य विभागात काम करणाऱ्या एका रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रामाणिक हे पैसे संबंधिताला पोलिसांच्या मार्फत आज सुपूर्द केले. चालकाच्या प्रामाणिकपणाचे आज ग्रामस्थांच्यावतीने कौतुक करण्यात आले.
जाहिरात
       सध्या लॉक डाऊनलोड च्या काळात अनेक बँकेचे ग्राहक एटीएम मशिनचा वापर करतात. असे वेळी झालेल्या हलगर्जीपणा अथवा तांत्रिक बिघाडामुळे मनस्तापाची वेळ कशी येते याचे हे एक उदाहरण आहे. मोरगाव - जेजुरी रोडवरील हॉटेल जवळ असलेल्या एटीएम मशीन मध्ये हा प्रकार घडला. याच गावातील नितीन तावरे हा तरुण पैसे काढण्यासाठी येथे गेला असता एटीएम मधून मागणी असलेली रक्कम मिळाली नाही.

     याच ठिकाणी संध्याकाळी पैसे काढण्यासाठी गेलेल्या आरोग्य विभागातील रुग्णवाहिका चालक दिपक गायकवाड हे त्यांचे पैसे काढत असताना ज्यादा रक्कम प्राप्त झाली. त्यांनी ते पैसे परत देण्यासाठी स्थानिक पत्रकार मनोहर तावरे यांचे मदतीने सोशल मीडियावर पोस्ट ही शेअर केली. यानंतर ज्या व्यक्तीचे पैसे अडकले त्यांनी आज संपर्क  साधून ही हकीकत सांगितली. मोरगाव पोलिस मदत केंद्राच्या वतीने संबंधित व्यक्तीकडे खात्री करून ही रक्कम आज सुपूर्द करण्यात आली.
      मोरगाव येथील पोलिस मदत केंद्रात पैसे गहाळ झालेली व्यक्ती व सापडले दोघांची खात्री करून पोलीस उपनिरीक्षक राजाराम साळुंके सह पोलीस हवालदार संजय मोहिते ,शरद धेंडे , सुशांत पिसाळ यांचे सह जेष्ठ पत्रकार अशोक वेदपाठक हस्ते ही रक्कम संबंधितांना देण्यात आली.
To Top