"आठवणीतील किस्से" शहाजीराव काकडे देशमुख

Pune Reporter
"आठवणीतील किस्से" शहाजीराव काकडे देशमुख

सोमेश्वर रिपोर्टर- प्रतिनिधी

  माजी मुख्यमंत्री शरद पवार विरुद्ध नवीन चेहरा शाहजीकाका काकडे. . १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी बारामती तालुक्यातून ५४ हजार मतांचे घेतलेले लीड १९८५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजी काकडे यांनी ते १८ हजारावर आणले होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी शरद पवार यांच्या विरोधात शहाजी काकडे यांना उभे करून राज्यभर आखलेली रणनीती यशस्वी ठरली होती. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.
             बारामती तालुक्यातील निंबुत गावातील सहकार महर्षी मुगुटअप्पा काकडे यांचे धाकटे चिरंजीव एवढीच शहाजीकाका काकडे यांची ओळख...  तसा पाहता बारामती तालुक्यातील निंबुत गावाला राजकीय वारसा लाभलेला आहे. शालेय शिक्षण पुण्यातून मॉर्डन हायस्कुल तर महाविद्यालयीन शिक्षण काकडे महाविद्यालयातून  पूर्ण करत बी.कॉम ची पदवी घेतली. आणि नंतर  काकांनी सोमेश्वर कारखान्यात सेक्रेटरी पदावर काम करत सहकारात काम करणे पसंत केले. वडील कै मुगुटआप्पा काकडे सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक.. मात्र राजकारणामध्ये काकांना गोडी नव्हतीच..
त्यावेळी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. 
फलटण तालुक्यातील पाडेगाव नजीक बावकलवाडी येथे  एका  कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री   वसंतदादा पाटील  आले होते.  संपतराव माने यांच्या फार्महाऊसवर जेवणाची व्यवस्था केली होती संपतराव माने हे काकडेंचे   जवळचे नातेवाईक  संपतराव माने यांचे चिरंजीव  किरण माने यांनी शहाजी काकडे यांना जेवणाची निमंत्रण दिले  होती आणि जेवण करण्यासाठी म्हणून शहाजी काकडे गेले होते. आणि त्या ठिकाणी संपतराव माने यांनी शहाजी काकडे यांची भेट वसंतदादा पाटील यांच्याशी घालून दिली जेवण झाल्यानंतर  वसंतदादाना विश्रांती घेण्याची सवय होती विश्रांती घेतल्यानंतर  शहाजी काकडेंना बोलावून घेतले आणि तु शरदच्या विरोधात उभा  राहा. यावर कधीच राजकारणाची पायरी न चढलेले शहाजी काका यांना काय बोलावे सुचले नाही.  मला शेतीची आवड आहे राजकारणाचे एवढी आवड नाही मी कारखान्यात नोकरी करतो, त्यावेळी त्यांनी मला तिकीट देण्यापेक्षा मोठे बंधू आनंदराव दादा काकडे यांना तिकीट द्यावे असे सुचविले होते.   पण फारच आग्रह झाल्यानंतर मी कुटुंबातील सर्वांशी  चर्चा करून  निर्णय कळवतो असे सांगितले.  त्यानंतर काही दिवसांनी काकांना  पुन्हा मुंबईला वर्षावरून त्यांना बोलवणे आले त्या ठिकाणी शहाजीकाका गेले असता त्याठिकाणी काँग्रेसच्या पुणे जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नेत्यांकडून काकांच्या नावाला कडाडून विरोध झाला होता.
          शहाजीराव काकडे यांना आय काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली.शरद पवारांना पुलोद मधून एस काँग्रेसमधून उमेदवार म्हणून उभे होते. त्यावेळी प्रचार २१ दिवस चालत होता त्यामुळे शहाजीराव काकडे यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला यामध्ये बारामती तालुक्यातील वाड्या वस्त्या पिंजून काढल्या. काँग्रेस आय चा नवखा उमेदवार आणि मतदारांपर्यंत पोहचण्याचा दृष्टीने  काकांनी हाऊस टु हाऊस  प्रचार केला आणि  यांची परिणीती मतदारांचा मतदानात परिवर्तन झाले. काकडे यांच्या प्रचाराला दस्तरखुद्द वसंतदादा पाटील येणार होते पण त्यांच्या पुतण्याचा अपघात निधन सांगली येथे झाला त्यामुळे तेथे ते दोन तीन दिवस अडकून पडले .परंतू वसंतदादा यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शहाजी काकडेंच्या सांगता सभेला सुनील दत्त, आणि आनंदराव थोपटे तसेच प्रचारसभांमध्ये मनोजकुमार,एच के एल भगत, विठठलराव गाडगीळ अशा दिग्गजांच्या सभा झाल्या अनंतराव थोपटे यांनी पूर्ण बारामती विधानसभा मतदारसंघात रामभाऊ भगत,  बाळासाहेब गावडे व अन्य सहकाऱ्यांना घेऊन हा मतदारसंघ पिंजून काढला. सोमेश्वर काारखान्याचे संचालक याांनी शहाजीराव काकडे यांचा प्रचार केला.  हि निवडणूक अटीतटीची झाली विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल  लागल्यानंतर काकडे यांना वर्षावरून फोन आला वसंतदादांनी त्यांना बोलावून घेतले  त्यावेळी आय काँग्रेस पक्षाचा सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं महाराष्ट्रातून वर्षावर निवडून आलेले आमदार येत होते आणि वसंतदादांनी शहाजीकाकाना शेजारी बसून घेतले व निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराला या युवकांमुळे आपले सरकार आले असे सांगत होते. 

          शहाजीराव काकडे यांना उभी करण्यामागे वसंतदादा चा  रणनीतीचा भाग होता की शरद पवारांना बारामतीत गुंतवून ठेवायचे आणि राज्यात आय काँग्रेस च्या जास्त जागा निवडून आणायच्या आणि तो प्रयोग  यशस्वी झाला. १९८५ ला एस काँग्रेस पेक्षा आय काँगेस ला जास्त जागेवर विजय मिळवला होता.  या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे बारामती तालुक्यातील काटेवाडी, ढेकळवाडी सह तालुक्यातील काही बुथ वर 
 शहाजीराव काकडे यांनी आघाडी घेतली होती. या निवडणुकीत बारामती येथे प्रचारासाठी बाहेरून येणाऱ्या वक्त्यांना खालच्या पातळीवर व्यक्तिगत टीका करण्यास शहाजीराव काकडे यांनी मज्जाव केला होता. त्यामुळे आजही पवार साहेब आणि शहाजी काकडे यांचे सलोख्याचे संबंध आहेत

थेट प्रतिभा काकींना च केली होती हात जोडून मतदान करण्याची विनंती
१९८५ च्या विधानसभा निवडणूकित शहाजी काकडे हे बारामती तालुक्यात हाऊस टू हाऊस प्रचार करत होते. शरद पवार यांचा बंगला आमराईत होता हे शहाजी काकडे यांना ठाऊक नव्हते. काकडे यांनी शरद पवार यांच्या बंगल्याचे गेट उघडले आणि थेट चालू लागले. मात्र त्यांच्या बरोबर असणारे कार्यकर्ते गेट च्या बाहेरच थांबले. यावर काकांनी विचारले होते काय झाले. एकजण बोलला हा पवार साहेबांचा बंगला आहे यावर काका बोलले त्याला काय होतंय चला. काका बंगल्यात गेले प्रतिभा काकी आणि सद्याच्या खासदार सुप्रिया सुळे बसल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया ताई खूप लहान असल्याचे काका सांगतात. काका बंगल्यात जातात मी शहाजी मुगुटराव काकडे.... काँगेस आय चा उमेदवार असे सांगून मतदान करण्याची विनंती केली होती. यावर प्रतिभा काकींनी शहाजी काकांच्या हातावर साखर ठेवली आणि निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
To Top