बारामती सराफ असोसिएशन च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यतानिधीसाठी १११००० रुपयांची मदत

Pune Reporter
बारामती सराफ  असोसिएशन च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यतानिधीसाठी १११००० रुपयांची मदत

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्घव  ठाकरे  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत " बारामती सराफ असोसिएशन "  च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख ११००० हजार रुपयांचा चा धनादेश आज बारामती चे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.
जाहिरात
 
          या वेळी सराफ असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर,कार्याध्यक्ष सुधीर पोतदार, सेक्रेटरी ए. बी. होनमाने, रघुनाथ बागडे,गणेश जोजारे,महेश ओसवाल ई.पदाधिकारी उपस्थित होते.

बारामती सराफ असोसिएशन च्या वतीनेभूकंपग्रस्त,पूरग्रस्त, मूकबधिर ,मतिमंद ,अनाथ मुलांच्या आश्रम शाळा,वृद्धाश्रम,गरीब रुग्ण,गरीब खेळाडू, बारामती तालुक्यातील हजारो नेत्र रुग्णांना चष्म्याचे वाटप  इत्यादी गरजूंना आज पर्यंत मदत केलेली आहे असे सराफ असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले,सराफ असोसिएशन च्या सर्व सभासदांना प्रत्येकी ५ लिटर स्यानिटाईझर चे देखील मोफत वाटप करणार असल्याची माहिती आळंदीकर यांनी दिली.
To Top