धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती पुरंदर किल्ल्यावर साजरी

Pune Reporter
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती पुरंदर किल्ल्यावर साजरी

नीरा : दि-१४ प्रतिनिधी

           "धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन व त्यांनी केलेला संघर्ष आपणासाठी प्रेरणादायी आहे हेच विचार आणि आचार आपण जोपासण्यासाठी कटिबद्ध राहूया"असे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी शासकीय छोटेखानी कार्यक्रमात सांगितले.
जाहिरात 
            दरवर्षी प्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती पुरंदर किल्ल्यावर साजरी करण्यात आली. पुरंदरचे आमदार संजय जगताप व सभापती नलिनी लोळे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत यांचेसह निवडक अधिकारी पदाधिकारी यांच्या हस्ते पुरंदरेश्वराच्या शिवालयात पुजा व छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली. यावेळी जन्मस्थळ ठिकाणीही महाराजांच्या पुतळ्याची पुजा करुन अभिवादन करण्यात आले.
          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडावर कडेकोट बंदोबस्त होता. तरीही शासकिय पातळीवर योग्य ती दक्षता व परवानगी घेत पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती पुरंदर यांचे तर्फे परवानगी घेऊन शासकीय पातळीवर जयंती साजरी केली. त्यानुसार मान्यवरांच्या हस्ते साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली.
दरवर्षी हजारो लाखो शंभुभक्त गडावर जयंतीच्या निमित्ताने येत असतात गड गर्दीने फुलून गेलेला असतो मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे शंभू भक्तांची निराशा झाली.
           यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, दत्तात्रय झुरंगे, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस. हाके, गटविकास अधिकारी मिलींद मोरे, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गणेश जगताप, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष राजाभाऊ जगताप, पानवडीचे सरपंच हरिभाऊ लोळे, केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, शिक्षक नेते संदीप कदम, संजय लवांडे, नंदकुमार चव्हाण, शांताराम कावडे आदी उपस्थित होते. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व संयोजन पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने केले.
To Top