सोमेश्वर कारखान्याचे फायनान्स मॅनेजर कदम यांना कामावरून काढून टाकून आर्थिक वसुली करावी

Pune Reporter

सोमेश्वर कारखान्याचे फायनान्स मॅनेजर कदम यांना कामावरून काढून टाकून  आर्थिक वसुली करावी

सोमेश्वरनगर -विशेष प्रतिनिधी तुषार धुमाळ

सोमेश्वर कारखान्याचे फायनान्स बी एन कदम यांना नियमबाह्य दिलेली मुदतवाढ रद्द करून आर्थिक वसुली करण्याचे आदेश साखर संचालक उत्तम इंदलकर यांनी दिले आहेत.
#जाहिरात  
             याबाबत कारखान्याचे सभासद विकास मधुकर धुमाळ यांना साखर आयुक्त आयुक्तांकडे धाव घेतली होती. याबाबत त्यांनी २० जानेवारी रोजी पत्रव्यवहार केला होता. याबाबत महाराष्ट्र राज्य साखर संचालक यांनी १३ फेब्रुवारी २० रोजी सोमेश्वर कारखान्याला पत्र पाठवून कारखान्याचे सेवानिवृत्त फायनान्स मॅनेजर बी एन कदम यांना दिलेली नियमबाह्य मुदतवाढ रद्द करून त्यांचेकडून आर्थिक वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सखार संचालकांनी कारखान्याला दिलेल्या पत्रात म्हनटले आहे की, कारखान्याने फायनान्स मॅनेजर बी एन कदम यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर एक वर्षाची मुदतवाढ दिली असल्याबाबत व इतर कारखान्यापेक्षा जास्त  वेतन दिले, कारखान्याच्या सेवेतून एखांद्या अधिकारी अथवा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास त्याला पुन्हा मुदतवाढ देण्याची आवश्यकता नाही तरी आपण योग्य ती कारवाई करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. 
            
     तसेच पुन्हा कारखान्याचे सभासद जाधव यांनी याच विषयावर दि २९ एप्रिल २० रोजी  साखर आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. यावर ११ मे २० रोजी साखर संचालक इंदलकर यांनी कारखान्याला पुन्हा आदेश दिले आहेत. याबाबत साखर संचालक यांनी कारखान्याला दिलेल्या आदेशात म्हनटले आहे. कुठलीही आवश्यकता नसताना देखील वर्षानुवर्षे काही अतांत्रिक अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा घाट घातला जात असून लाखो रुपयांची उधळपट्टी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या  वेतनावर केली जात असून ही बाब गंभीर आहे. कारखाना व्यवस्थापनावरील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात यावे तसेच त्यांना दिलेल्या वेतनाची रक्कम वसूल करावी. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजीच्या पात्रात कारखान्याला याबाबत कळविले होते. याविषयावर पुन्हा कारखान्याला कळविण्यात येते की सेवानिवृत्त अधिकारी अथवा कामगार यांना कामावर ठेवण्याचे कोणतेही प्रयोजन नसून तात्काळ अशा अधिकारी व कामगार यांना कामावरून काढून टाकावे असे आदेशात म्हनटले आहे.
To Top