खुशखबर ! कोरोनवरील औषधासाठी झाला आंतरराष्ट्रीय करार
ज्युबिलंट लाईफ सायन्स व गिलिड कंपनी दरम्यान मोठा करार
नीरा:प्रतिनिधी सनी निगडे
आघाडीच्या एकात्मिक औषध निर्माण व जीवन विज्ञान कंपनी असलेल्या ज्युबिलंट लाईफ सायन्सेस लि ची उपकंपनी असलेल्या ज्युबिलंट जेनरिक्स लि ने गिलीड सायन्सेस इन्क.शी अनन्य (नॉन-एक्सक्लुझिव्ह) परवाना करार केला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक औषध निर्मितीच्या क्षेत्रात या कंपन्यांचा कराराला जागतिक दर्जावर मोठे महत्त्व प्राप्त झाले असून आता जगाचे लक्ष या कंपन्यांतील वाटाघाटी व तयार होणाऱ्या औषधाकडे लागले आहे.
ज्युबिलंट ला रेमडेसिवीर या कोविड -१९ साठी संभाव्य औषधाची भारतासह १२७ देशात नोंदणी, उत्पादन व विक्री करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या देशांमध्ये कमी व माध्यम उत्पन्न गट असेल्या देशांचा तसेच आरोग्यसेवांबाबत अनेक समस्या अनुभवत असलेल्या व उच्च उत्पन्न गट असलेल्या देशांचाही समावेश आहे. या परवाना करार अंतर्गत ज्युबिलंटला गिलीडच्या उत्पादन प्रक्रियेचे तंत्रज्ञान हस्तांतरण प्राप्त करण्याचे अधिकार मिळतील. यामुळे नियामक मान्यता मिळाल्यावर संभंधित देशांमध्ये उत्पादन वाढवून कोविड -१९ रुग्णांना हे औषध जलदरीत्या उपलब्ध होण्यास मदत होईल .
या भागीदारी बाबत बोलताना ज्युबिलंट लाईफ सायन्सेसचे अध्यक्ष श्याम. एस भाटिया आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हरी. एस भाटिया म्हणाले की गिलिड बरोबर रेमडेसिवीरशी परवाना करार करत आमची भागीदारी अधिक दृढ करताना आम्हाला आनंद होत आहे. जगाला आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी मध्ये घेऊन जाणाऱ्या कोविड -१९ या महामारीवर प्रार्थमिक माहिती नुसार रेमडेसिवीर हे संभाव्य औषध असू शकते. क्लिनिकल चाचण्या आणि नियामक मंजुरींवर आम्ही लक्ष ठेऊन राहू व आवश्यक त्या नियामक मंजुरी मिळाल्यावर हे औषध उपलब्ध करण्यासाठी सज्ज राहू. या शिवाय ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियन्ट (ए.पी.आय.) हा औषधाचा घटकाची निर्मिती आमच्याकडेच करण्याची योजना असून यामुळे कमी खर्च व उप्लब्धतेत सातत्य मिळण्यास मदत होईल. .
रेमडेसिवीर या गिलिडनी विकसित केलेल्या अँटीव्हायरल थेरपी ला कोविड -१९ चा उपचारासाठी यु.एस.एफ.डी.ए कडून इमर्जन्सी युज ऑथरायझेशन ( ई.यू.ए) प्राप्त झाले आहे. यामुळे कोविड-१९ ने गंभीररित्या ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीरचा वापर सुलभ होईल .