वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे वाटप
सोमेश्वरनगर प्रतिनीधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर परिसरातील ग्रामस्थांना कोरोना विरोधात प्रतिकार शक्ती वाढवावी यासाठी वाघळवाडी -सोमेश्वरनगर ग्रामपंचायत चे उपसरपंच जिंतेद्र संकुडे यांनी वाढदिवसाचा अन्नावश्यक खर्च टाळून गावा मध्ये असैनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप व नागरिकांना स्वच्छ भाजी पाला वाटप करण्यात आला. या वेळी डी. एम.सोशल फौंडेशन चे सस्थापक अध्यक्ष दादासाहेब मांगडे,अजिंक्य सांवत, अमित शिंदे, हेमंत गायकवाड , विकास सावंत , बाळकृष्ण भोसले , अविनाश सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.
सोशल डिस्टन्स नियम पाळत वाटत करण्यात आले कोरोना च्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी या विषयी माहिती देण्यात आली.या प्रसंगी मास्क,सॅनिटायझर चे ही वाटप करण्यात आले.