मांढरगाव हे तीन दिवस संपूर्ण बंद पुरंदरमधील कोरोनामुळे पहिला मृत्यू
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील कोरोनामुळे पहिला मृत्यू झालेचे निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने पुरंदरच्या तहसिलदार रुपाली सरनोबत यांनी मांढर गावची पाहणी केली व तीन दिवस कोणताही व्यक्ती बाहेरून गावात येणार नाही व गावातील कोणत्याही व्यक्ती बाहेर जाणार नाही. तसेच मांढरगाव हे तीन दिवस संपूर्ण बंद ठेवण्याचे आदेश ही पुरंदरच्या तहसिलदार रुपाली सरनोबत यांनी दिले आहेत.
मांढर गावातील एका जेष्ठ नागरिकाला सासवड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनासमक्ष लक्षणे दिसून आल्याने ग्रामीण रुग्णालय, सासवड येथे रविवारी हलविण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा शासकीय ग्रामीण रुग्णालय, सासवड येथे पाहटे मृत्यू झाला होता. त्यावेळी ग्रामीण रुग्णालयाने त्यांचा स्वेप घेतला होता. आज दि. ०२ रोजी त्यांचा रिपोर्ट हा कोरोना पोजिटीव्ह आल्याचे समजले.
मांढरगाव पुढील तीन दिवस संपूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. त्याबरोबर गावातील दूध संकलन हे तीन दिवस करण्यात येऊ नये असे ही यावेळी सांगण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून मांढर गावठाण, उपळवस्ती, तांबेकरवस्ती, कुंभारवस्ती, काटेवस्ती, बौद्धवस्ती, टेलरवस्ती, मोरेवस्ती, साळुंकेवस्ती, पापळवस्ती, खोमणेवस्ती, माळवाडी व निकमवस्ती तर टोनपेवाडी व शिंदेवाडी यांचा बफरझोनमध्ये समाविष्ट करणात आले आहे.
यावेळी तहसिलदार रूपाली सरनोबत यांचे बरोबर पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, गटविकास अधिकारी मिलिंद टोनपे, मंडळ अधिकारी सोमनाथ वांजळे, तलाठी निलेश अवसरमोल, ग्रामविकास अधिकारी शशांक सावंत, सरपंच सचिन शिंदे, हमीद शेख आदी उपस्थित होते.
जाहिरात