मुरूम येथील गुंडगिरीबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देणार: ग्रामस्थांचा एल्गार

Pune Reporter
मुरूम येथील गुंडगिरीबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देणार: ग्रामस्थांचा एल्गार

सोमेश्वरनगर   प्रतिनिधी

मुरूम ता बारामती ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तळवणीनगर येथे दिवसेंदिवस गुंडगिरी वाढत चालली असून याठिकाणी गुन्हेगारी उधाण आले आहे, याबाबत पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे मुरूम ग्रामस्थांनी निर्धार केला आहे. 
           मुरूम येथील तळवणीनगर मध्ये दि २९ रोजी संतोष घोरपडे या ३२ वर्षीय युवकाने आत्महत्या केली होती, मात्र ही आत्महत्या नसून हा घातपात असल्याचा संशय संतोष याचे भाऊ राजेंद्र आणि संजय घोरपडे यांनी केला होता, याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सह्ययक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, ग्रामपंचायत मुरूम आणि समस्त ग्रामस्थ मुरूम यांना याबाबत अर्ज केला होता. याबाबत दि ३१ रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे, यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तर याच बाबत आज सकाळी मुरूम ग्रामस्थांची मिटिंग पार पडली, यावेळी मरूम गावातील जवळपास शंभर च्या वर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तळवणीनगर या भागात दिवसेंदिवस अपप्रवृती लोक वाढत चालले असून याठिकाणी गुंडगिरी चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वेळीच यावर वचक बसवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील तसेच गृहमंत्री यांना निवेदन देणार असल्याचे ग्रामस्थांच्या चर्चेत ठरले आहे.
जाहिरात
जाहिरात
To Top