सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कोऱ्हाळे बु येथील एका जेष्ठ व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बारामती तालुक्याची कोरोना बधितांची संख्या १९ पोहचली आहे.
सदरील व्यक्ती ही काही दिवसापासून आजारी होती, त्यांना रुई येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली तर ती पॉझिटिव्ह निघाली असल्याची माहिती तालूका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली