३० दिवसामध्ये दोन चंद्रग्रहण तर एक सूर्यग्रहणाचा दुर्मिळ योग-प्रा.डॉ. मिलिंद कारंजकर

Pune Reporter
३० दिवसामध्ये दोन चंद्रग्रहण तर एक सूर्यग्रहणाचा दुर्मिळ योग-प्रा.डॉ. मिलिंद कारंजकर

 


सोमेश्वरनगर   प्रतिनिधी  दि-२ जुन

या जून महिन्या मध्ये दिनांक 5 जून रोजी चंद्रग्रहण तर २१ जून रोजी सूर्यग्रहण व ५ जुलैला परत चंद्रग्रहण होणार आहे .तीस दिवसांच्या कालावधीत दोन चंद्र ग्रहणे व एक सूर्य ग्रहण हा दुर्मीळ योग आहे .या तीन ग्रहणांपैकी ५ जूनचे चंद्रग्रहण व २१ जूनला होणारे सूर्यग्रहण भारतामधून दिसणार आहे .मात्र ५ जुलै रोजी होणारे चंद्रग्रहण भारतामधून दिसणार नसल्याचे मत कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयाचे पदार्थविज्ञान व खगोलशास्त्र विभाग प्रमुख  डॉ मिलिंद कारंजकर यांनी 
         या वर्षांमध्ये दोन सूर्यग्रहणे व चार चंद्रग्रहणे म्हणजे  एकूण सहा ग्रहणे होणार आहेत .यापूर्वी 10 जानेवारीला पहिले चंद्रग्रहण पाहावयास मिळाले  होते. दि ५ जुन रोजी सुरु होणारे ग्रहणाची सुरुवात रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी होणार असून ते ६ जूनच्या पहाटे २ वाजून ३४ मिनिटांनी संपणार आहे . म्हणजेच या  ग्रहण चा कालावधी  ३ तास १५ मिनिटे व ४७ सेकंदापर्यंत असणार आहे .चंद्रग्रहण हे तीन प्रकारची असतात त्यांना पुर्ण अथवा खग्रास ,आंशिक अथवा खंडग्रास व छायाकल्प ग्रहण असे म्हणतात .दि ५ जुनचे ग्रहण हे छाया कल्प प्रकारचे आहे .
ज्या वेळी पृथ्वि हि सूर्य आणि  चंद्र यांच्या मध्ये येते त्यावेळी पृथ्वी हि चंद्रावरती पडणारी सूर्य किरणे अडवते अथवा थांबवते आणी चन्द्रावरती पृथ्वीची सावली पडते याला चंद्रग्रहण असे म्हणतात .दि ५ जून ला होणारे ग्रहण हे छायाकल्प  प्रकारचे असल्याने चन्द्र हा पृथ्वीच्या बाह्य सावली मधून जाणार आहे.याला इंग्रजी मध्ये pneumbra असे म्हणतात. हे ग्रहण आशिया ऑस्ट्रेलिया ,युरोप ,आफ्रिका, साऊथअमेरिका ,पॅसिफिक , अंटार्टिका इत्यादी भागामंध्ये पाहावयास मिळणार आहे. 
दि २१ जून रोजी होणारे सूर्य ग्रहण हे सकाळी १० वाजून ३ मिनिटांनी सुरु होणार असून १ वाजून २८ मिनिटांनी संपणार आहे.ह्या ग्रहणाचा कालावधी ३ तास २५ मिनिटे व २९ सेकंद एवढा असणार आहे.तसेच ५ जुलैस होणारे छायाकल्प चंद्रग्रहण सकाळी ८ वाजून ३७ मिनीटांनी सुरु होणार असून ते सकाळी ११ वाजून २२ मिनीटांनी संपणार आहे.हे ग्रहण सकाळी असलेने भारतामधून पाहावयास मिळणार नाही . ग्रहणे म्हणजे सावल्यांचा खेळ असतो. तीस दिवसामध्ये तीन ग्रहणे म्हणजे खगोलप्रेमीच्या   बरॊबर समस्त नागरिकांना देखील हि एक आनंद पर्वणी आहे .या ग्रहणाच्या बद्दल कुठली हि अंधश्रद्धा पाळू नये. असेही डॉ कारंजकर यांनी सांगितले.
जाहिरात

जाहिरात
To Top