कोथिंबीरीत शेतकरी मालामाल..वीर च्या शेतकऱ्याला दीड एकरात सव्वातीन लाख
वीर : प्रतिनिधी
वीर ता पुरंदर येथील सोमेश्वर कारखान्याच्या संचालिका ऋतुजा राजेंद्र धुमाळ यांच्या दीड एकर कोथिंबीरीला तब्बल ३ लाख २५ हजार रुपये मिळाले. गेल्या तीन महिन्यापासून तरकारी मध्ये शेतकरी बुडाला आहे, मात्र गेल्या आठवड्यापासून कोथिंबीरीला मिळणारे दर आश्चर्यचकित करणारे आहेत.
काल बारामती तालुक्यातील संजय जगताप यांच्या एक एकर कोथिंबीरीला तब्बल ३ लाख २१ हजार तर राजेंद्र जगताप यांच्या १७ पांड कोथिंबीरीला २ लाख ११ हजार दर मिळाला. आज पुरंदर तालुक्यातील वीर येथील शेतकरी ऋतुजा राजेंद्र धुमाळ यांच्या दीड एकर कोथिंबीरीला ३ लाख २५ हजार रुपये दर मिळाला आहे. जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्याच्या कोणत्याही भाजीपाला पिकाला दर मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. मात्र कोथिंबीरी मुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
राजेंद्र धुमाळ- शेतकरी वीर
मी वीर (घोडेउड्डाण) येथे दीड एकरात महिन्यापूर्वी दीड एकर कोथिंबीर केली होती. यासाठी मला जवळपास ५० हजार रुपये खर्च आला आहे.