पुरंदरमधील मांढर येथील वृद्धाचा मृत्यू. कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
पुरंदर प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील मांढर येथील एका वृध्दाचा त्यांच्या जुन्या आजाराने सोमवारी मृत्यु झाला होता. ते शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांची कोरोना टेस्टसाठी स्वॅप घेतला होता. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुरंदर तालुक्यात कोरोना रुग्ण मृत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट प्रलंबित होता आज मंगळवारी सकाळी त्यांचा रिपोर्ट पुरंदरच्या प्रशासनाने पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर केले आणि पुरंदरकरांना धक्का बसला.
पुरंदर तालुक्यात वीरचा रुग्ण उपचारांती निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करत सवई सर्जाच्या नावाच चांगभलं असा जयघोष करीत त्या युवकाचे सर्वात वीरकरांनी केले. तर तालुक्यातील पाच पॉझिटिव्ह रुग्णांनवर उपचार सुरू आहेत. काल सोमवारी मांढर येथील ८५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा पहाटे सासवडच्या ग्रामिण रुग्णालयात निधन झाले. त्यांना यापुर्वी वेगवेगळ्या व्याधी होत्या. त्यांच्या व्याधिंवर उपचारासाठी ते खाजगी रुग्णालयात दाखल झाले होते. उपचारा वेळी त्यांच्या खाजगी रुग्णालयात विवीध चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये एच. आर. टीसी व सि.टि.स्कॉन करण्यात आले त्यावेळी त्यांच्या छातीमध्ये कफ दिसून आला. ही सर्व लक्षणे कोरोनाची असल्याने त्यांना सासवडच्या ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. अधिक्षकांनी या रुग्णाची लक्षणे पाहता त्यांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. रुग्णाला पुढिल उपचारासाठी ससुन रुग्णालयात पाठवण्याची तयारी सुरू होती. रुग्णवाहिका येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.
सासवडच्या ग्रामिण रुग्णालयात त्यांची कोरोना टेस्टसाठी स्वॅप घेतला होता. त्यांचा अहवाल येणे बाकी असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुरंदर मध्ये एकच खळबळ उडाली आहे. काल दिवसभर पुरंदर तालुक्यात लोकांनमध्ये अफवांचा पेव फुटला होता. पुरंदर प्रशासनाने आव्हान केले होते की जोपर्यंत शासकीय अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणतीच काळजी करण्याची गरज नाही. कोणत्याही अफवेला बळी पडू नका. पण आज मंगळवारी सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि प्रशासन पुढिल उपाय योजनेसाठी मांढरच्या दिशेने रवाना झाले आहे. हाय रिस्क मधील व लो रिस्क मधील लोकांना कॉरंटाइन करण्यात येत आहे. गावात प्रतिबंधीत क्षेत्र व बफर झोन थोड्याच वेळात जाहिर केले जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
रुपाली सरनोबत- तहसीलदार पुरंदर
'मागील साठ दिवसांत पुरंदरच्या लोकांनी प्रशासनाला योग्य साथ दिल्याने पुरंदर मध्ये कोरोना ऱोखण्यात यश आले होते. वयस्कर व्यक्तीचे निधन झाल्यानंतर काळजी घेणे आवश्यक आहे. ही व्यक्ती जासू लोकांच्या संपर्कात आली नसावी. त्यामुळे संसरर्गाची भिंती नाही असे वाटते. पुरंदर तालुक्यातील लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. मांढर हे गाव डोंगरभागात आहे त्यामुळे येथील लोकांचा संपर्क तालुक्यातील लोकांशी तसा जादा नसतो.'
जाहिरात