अबब.....वाणेवाडीत एक एकर कोथिंबीर तब्बल ३ लाख २१ हजारांना

Pune Reporter
अबब.....वाणेवाडीत एक एकर कोथिंबीर तब्बल ३ लाख २१ हजारांना

सोमेश्वरनगर   प्रतिनिधी

वाणेवाडी (मळशी) ता बारामती येथील वाणेवाडी चे उपसरपंच संजय झुंबरराव जगताप यांची एक एकर कोथिंबीर तब्बल ३ लाख २१ हजारांना तर राजेंद्र संपतराव जगताप यांची १७ पांड कोथिंबीर तब्बल २ लाख ११ हजारांना विकली गेली आहे. 
               गेल्या पाच वर्षातील बारामतीच्या पाश्चिम भागातील सर्वात मोठा व्यवहार असल्याचे व्यापारी अभिजित शिंदे यांनी सांगितले. 

संजय जगताप- शेतकरी
माझी मळशी या ठिकाणी शेती असून मी एक एकरात कोथिंबीर केली होती. तसे हे ३५ दिवसांचे पीक असून पिकाची प्रत चांगली असल्याने याचा २८ व्या दिवशीच व्यवहार झाला. यासाठी मला ३५ हजार रुपये खर्च आला आहे. 

अभिजित शिंदे- कोथिंबीर चे व्यापारी
मी गेल्या पाच वर्षापासून कोथिंबीर खरेदी विक्रीचे व्यवहार करत असून माझ्या माहितीनुसार सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील गेल्या पाच वर्षातील हा सर्वात मोठा व्यवहार आहे.
जाहिरात
जाहिरात
To Top