स्व.चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त नीरेत रक्तदान शिबिर.
पुरंदर : प्रतिनिधी
सहकार महर्षी स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त नीरा येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. भारती हॉस्पिटल व नीरा कोळविहीरे जिल्हा परिषद गट यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नीरा येथील निर्मल हॉस्पिटल (डॉ. बोरा) मध्ये भारती हॉस्पिटल यांच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान अभियानासाठी परिश्रम घेतले. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला मास्क, सॅनिटायझर व आर्सॅनिकम अल्बम ३० हे देण्यात आले. यावेळी आ. संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अॅड.विजय भालेराव, नीरेचे उपसरपंच विजय शिंदे, माजी सरपंच राजेश काकडे, चंद्रराव धायगुडे, माजी उपसरपंच दीपक काकडे, कल्याण जेधे, बापू गायकवाड, नंदू शिंदे, अभिजीत भालेराव, जावेद शेख, दत्ता निंबाळकर अभिजित जगताप, ओजस जैन, मयूर फरांदे, आकाश कदम, दिनेश गायकवाड, सुरज शिंदे सह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी युवकांनी प्रयत्न केले. या रक्तदान शिबिरांमध्ये विशेषता युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी युवकांच्या एक पाऊल पुढे ठेवून मुलीही रक्तदान करताना दिसून आल्या. आमदार संजय जगताप यांचा युवकांवर असलेला प्रभाव यामुळे दिसून आला. सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
आमदार संजय जगताप यांनी नीरेतील ग्रामस्थांना आरोग्यमय शुभेच्छा दिल्या. सर्वांनी काळजी घ्या, विनाकारण घराबाहेर पडू नका, सॅनिटायजरचा वापर करा, हात सतत धुवा, मास्क लावा. पुढील काळात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाकडून जी काय मदत लागेल किंवा आरोग्य विभागाकडून काही साहित्य लागल्यास ते तात्काळ मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून नीरेकर ग्रामस्थांना सर्व सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन दिले.